विद्यार्थी भोजन डिबीटीचा प्रश्न अद्यापही अंधातरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:49 AM2019-06-07T11:49:24+5:302019-06-07T11:49:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभाग जिल्हास्तरावर चालवत असलेल्या वसतीगृहांमध्ये गेल्या वर्षापासून दिले जाणारे जेवण बंद करुन ...

The question of student food disbittal still remains blind | विद्यार्थी भोजन डिबीटीचा प्रश्न अद्यापही अंधातरीच

विद्यार्थी भोजन डिबीटीचा प्रश्न अद्यापही अंधातरीच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी विकास विभाग जिल्हास्तरावर चालवत असलेल्या वसतीगृहांमध्ये गेल्या वर्षापासून दिले जाणारे जेवण बंद करुन भोजन डिबीटी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ या निर्णयाला शासनाने स्थगिती दिल्याचे तीन महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होत़े परंतू असा कोणताही लेखी आदेश शासनाने काढलेला नसल्याने यंदाही जिल्हास्तरावर शिकणा:या विद्याथ्र्याचे भवितव्य अंधारात आह़े  
नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून नंदुरबार शहरात चालवल्या जाणा:या सात वसतीगृहांना गेल्यावर्षापासूून भोजन डिबीटी लागू करण्यात आली होती़ यानुसार प्रतिमाह 3 भोजन तर 600 रुपये निर्वाह भत्ता विद्याथ्र्याने देण्याचे निश्चित करण्यात आले होत़े परंतू प्रकल्प कार्यालयाकडून दर तीन महिन्यांनी विद्याथ्र्याच्या खात्यावर पैसे टाकण्यास सुरुवात झाल्याने डिबीटीला विद्याथ्र्याकडून विरोध झाला होता़ या पाश्र्वभूमीवर डिबीटी रद्द करण्यासाठी विद्याथ्र्यानी आंदोलने केली होती़ डिबीटीवर विचारविनिमय करुन रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तीन महिन्यांपासून सांगण्यात येत होत़े मात्र शासनाने भोजन डिबीटी रद्द करण्याचे कोणतेही लिखित आदेश किंवा शासकीय अध्यादेश काढलेला नसल्याने ही योजना कायम राहण्याची शक्यता आह़े निर्णय कायम राहिल्यास विद्याथ्र्याच्या वसतीगृह प्रवेशप्रक्रिया लांबण्याची शक्यता आह़े गेल्या वर्षात खाजगी मेसच्या जेवणामुळे अनेकांना आजारपण भोगावे लागले होत़े यातून गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही शहरी भागातील सर्व सात वसतीगृहात पूर्ण क्षमतेने प्रवेश होण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होणार आह़े 
एकीकडे डीबीटीचा प्रश्न रेंगाळत असताना दुसरीकडे वसतीगृहांमध्ये विद्यार्थी प्रवेशाचीही समस्या कायम आह़े ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने सुरु केलेले संकेतस्थळ कायम हँग होत असल्याने ऑनलाईन अर्ज पूर्णपणे भरले जात नाहीत़ 

नंदुरबार शहरात डिबीटी योजना लागू असलेली केवळ सात वसतीगृहे जिल्ह्यात आह़े यात 4 ठिकाणी मुले तर 3 ठिकाणी मुलींना प्रवेश दिला जातो़ गेल्यावर्षी भोजन डिबीटीच्या निर्णयामुळे या वसतीगृहांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवेश झालेले नव्हत़े कोरीट रोडवरील वसतीगृहात 125 विद्यार्थी क्षमता असताना 86, सिंधी कॉलनी वसतीगृहात 120 पैकी 43, शिक्षक कॉलनी 120 पैकी 54 तर 1 हजार विद्यार्थी क्षमता असलेल्या पटेलवाडी संकुलात केवळ 619 विद्याथ्र्याचे प्रवेश होत़े यात 447 जुनेच विद्यार्थी आहेत़ तर केवळ 172 नवीन विद्यार्थीच शहरात आले होत़े हा परिणाम भोजन डिबीटी सुरु झाल्याचा असल्याचे सांगण्यात आले होत़े दुर्गम व अती दुर्गम भागासह जिल्ह्यातील सपाटीच्या गावात मोलमजुरी करणा:या आई-वडीलांना शिक्षणाचा खर्च नको म्हणून विद्यार्थी 12 नंतर शिक्षणासाठी शहरात येतात़ दोन वेळच्या जेवणाची सोय होत असल्याने गेल्या अनेक वर्षात हजारो विद्यार्थी नंदुरबारातून शिक्षण घेऊन गेले आहेत़ महिन्याकाठी भोजनभत्ता देण्याचे सांगण्यात येत असले तरी तो प्रत्यक्षात तीन महिन्यांनी मिळत असल्याने विद्यार्थी तालुकास्तरावर किंवा शहराबाहेरील आदिवासी वसतीगृहात प्रवेशित होत आहेत़ नुकताच बारावीसह विद्यापीठस्तरीय परीक्षांचे निकाल जाहिर झाले आहेत़ असे असतानाही विद्यार्थी डिबीटी रद्द होण्याच्या प्रतिक्षेत आहेत़ निर्णयानंतरच पुढील प्रक्रिया सुरु होण्याची चिन्हे आहेत़ 
नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत नवापूर, शहादा आणि नंदुरबार या शहर आणि तालुक्यांमध्ये 29 वसतिगृहे आहेत़ यात मुलींचे 12, तर मुलांचे 17 वसतिगृह आहेत़ या सर्व 29 वसतिगृहात इमारत क्षमतेनुसार 4 हजार 785 विद्याथ्र्याना प्रवेश दिला जातो़  प्रारंभी केवळ जुने विद्यार्थी आणि विशेष बाबीतील विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो व नंतर नव्याने येणा:यांचा प्रवेश होतो़ गेल्या शैक्षणिक वर्षात 29 वसतिगृहात 2 हजार 478 विद्याथ्र्याचे प्रवेश झाले होत़े तर 2 हजार 307 विद्याथ्र्याच्या जागा रिक्त असल्याची माहिती आह़े याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आह़े 
 

Web Title: The question of student food disbittal still remains blind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.