नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानकावर ‘करंट तिकीट काऊंटर’ सुरु करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चाचपणी करण्यात येत आह़े पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजन ए़क़े गुप्ता यांनी स्थानिक रेल्वे प्रशासनाला याबाबत आढावा घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितला आह़े खासदार डॉ़ हिना गावीत यांनी यासाठी पाठपुरावा केला होता़ नंदुरबार रेल्वे स्थानकावर ‘करंट तिकीट’ मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी याबाबत खासदार डॉ़ हिना गावीत यांनी पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर ए़क़े गुप्ता यांच्याकडे पाठपुरावा केला होता़ पश्चिम रेल्वे मार्गावर केवळ सुरत रेल्वे स्थानकावरच करंट तिकीट काऊंटर देण्यात आले आह़े त्यानंतर भुसावळ येथेही जंक्शन असल्याने करंट तिकीट काऊंटर उघडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती़ आता नंदुरबार येथेही करंट तिकीटचे काऊंटर सुरु करण्यात यावे यासाठी नंदुरबार रेल्वे स्थानकाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आह़े ही समिती एक कार्यालयीन सव्रेक्षण करुन आपला अहवाल जीएम गुप्ता यांना सादर करणार आह़े त्यानुसार नंदुरबार स्थानकावर करंट तिकीट काऊंटर सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ वरिष्ट कार्यालयाकडे अहवालमुख्य वाणिज्य निरीक्षक राजकुमार यांना सव्रे तसेच करंट तिकीट काऊंटरबाबत चाचपणी करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला आह़े याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सव्रेक्षण करण्यास सुरुवातदेखील झाली असल्याची माहिती देण्यात आली़ हा अहवाल विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आह़े त्यानंतर तेथे त्याची पडताडणी झाल्यावर करन्ट तिकीट काऊंटरची आवश्यकता असल्यास हा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आह़े त्यानंतर काऊंटर उघडण्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, ही प्रक्रिया नेमकी कधी सुरु होणार याबाबत आताच सांगता येणे कठीण असल्याने मुख्य वाणिज्य निरीक्षक राजकुमार यांनी सांगितले आह़े रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले आह़े त्यामुळे साहजिकच या मार्गावर रँक पॉईट तसेच प्रवासी रेल्वे गाडय़ांची संख्या वाढविण्यात यावी या मागण्या जोर धरु लागत आह़े दुहेरीकरणामुळे उद्योग, व्यापाराला चालना मिळून परिणामी जिल्ह्याचा विकास होणे अपेक्षीत आह़े त्यासाठी प्रवाशांसाठीही विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी लोकप्रतिनिधींसह रेल्वे अधिका:यांचा कल दिसून येत आह़े पश्चिम रेल्वे मार्गावर केवळ सुरत येथेच करन्ट तिकीट काऊंटर उभारण्यात आले आह़े याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तेथील रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे नंदुरबार रेल्वे स्थानकावरही हा प्रयोग करण्यास हरकत नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, नंदुरबार रेल्वे स्थानकावर रोज किती प्रवासी रेल्वे येतात, सुपरफास्ट रेल्वे, स्पेशल रेल्वे, साप्ताहिक रेल्वे आदींची माहिती काढली जात आह़े तसेच या रेल्वेमध्ये किती प्रवाशांचे रोजचे येणे-जाणे असत़े याही आकडेवारीची जुळवा-जुळव करण्यात येत आह़े प्रवाशांची संख्या माजून तसा अहवाल रेल्वेच्या विभागीय कार्यालयाला सादर करण्यात येणार आह़े दुहेरीकरणाच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार?रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यात आले आह़े मात्र दुहेरीकरणाच्या उद्घाटनाचा सोपस्कार अद्याप पार पडलेला नाही़ त्यामुळे दुहेरीकरणाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती खासदार डॉ़ हिना गावीत यांनी दिली़ सध्याचे वर्ष लोकसभा निवडणुकींचे असल्याने उद्घाटनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी उद्घाटनाला उपस्थित राहून या माध्यमातून एक प्रकारे लोकसभा निवडणुकींचा प्रचारच करणार असल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरु आह़े
‘करंट तिकीट’साठी रेल्वेची चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:50 AM