रेल्वे फुल्ल; प्रवासाला आरक्षण मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:36 AM2021-09-14T04:36:18+5:302021-09-14T04:36:18+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे रेल्वे वाहतूक सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांमध्ये प्रामुख्याने प्रवास करताना आरक्षण सक्तीचे करण्यात आले ...
नंदुरबार : कोरोनामुळे रेल्वे वाहतूक सेवेत आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांमध्ये प्रामुख्याने प्रवास करताना आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. परिणामी रेल्वेच्या प्रत्येक डब्यात होणारी गर्दी आता दिसून येत आहे. सूरत ते भुसावळ मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधूनही प्रवासी संख्या नियंत्रणात येऊन गर्दी नावालाच दिसून येत आहे; परंतु यातून छोट्या स्थानकावरून मोठ्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीट आरक्षणाचा चार्ट कायम फुल्ल दाखविणे, मोबाईल ॲपमधून त्या गाडीचे सीट न मिळणे यामुळे उत्तर भारत किंवा दक्षिण भारतात जाणाऱ्यांचे हाल होत आहेत.
परराज्यांत जाण्यास अडचणी
सध्या सण-उत्सवाचा काळ सुरू आहे. त्यामुळे गुजरात राज्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे नंदुरबार किंवा नवापूर परिसरातून उत्तर भारतातील विविध शहरांसाठी आरक्षण करण्यासाठी गेल्यावर प्रवाशांना आरक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
नवजीवन एक्स्प्रेस
हावडा एक्स्प्रेस
ओखा पुरी एक्स्प्रेस
प्रेरणा एक्स्प्रेस
ताप्तीगंगा एक्स्प्रेस
सूरत मार्गावर गर्दी कमीच
गुजरातमधून भुसावळ ते नागपूरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. येथून पुढील प्रवासाला सुरुवात होते. त्यातून या गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे; परंतु गुजरातकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मात्र तुरळक अशी गर्दी सध्या दिसून येत आहे.
आरक्षणातून रेल्वेतील गर्दीवर नियंत्रण मिळवत शिस्त लावण्याचा रेल्वेने प्रयत्न केला आहे; परंतु काहीबाबत ‘जैसे थे’ स्थिती आहे.
प्रामुख्याने रेल्वे स्थानकात येणारे प्रवासी तसेच त्यांना सोडण्यात येणारे अनेक जण अद्यापही मास्कचा वापर करत नाहीत.
रेल्वेगाड्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग अजूनही हरवले आहे. गर्दी कमी असली तरी गाड्यांमध्ये मास्कचा वापर टाळला जातो.
अनेक वेळा रेल्वे फिरणारे फेरीवाले व इतरांच्या तोंडावर मास्क नसल्याने चित्र दिसून आले आहे.