लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रमाई आवास योजनेचे प्रस्ताव तालुक्यांतील पंचायत समितीमध्येच पडून असल्याची बाब उघड झाली आह़े त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्याला काहीच दिवस शिल्लक असताना 2017-2018 साठीचे अजूनही 661 घरकुलांचे लक्ष कायम आह़े ग्रामीण विकास यंत्रणला चालू आर्थिक वर्षासाठी एकूण 970 घरकुलांचे टार्गेट देण्यात आले होत़े त्यापैकी 319 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असली तरी, अद्याप 661 घरकुलांचे टार्गेट पूर्ण करण्याचा लक्षांक विभागासमोर कायम आह़े त्यातच पंचायत समितीमार्फ त रमाई आवास योजनेच्या प्रस्ताव पाठविण्याबाबत ढिसाळ कार्यवाही करण्यात येत असल्याने मार्चअखेरीर्पयत हे टार्गेट पूर्ण होणार काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े दरम्यान, धडगाव व अक्कलकुवा तालुक्याचा घरकुलांचा लक्षांक पूर्ण झाला असल्याची माहिती मिळाली दोन्ही तालुक्यांना अनुक्रमे 44 व 49 घरकुलांचे टार्गेट देण्यात आले होत़े त्या सर्वाना मंजुरी देण्यात आली आह़े 29 डिसेंबर रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची बैठक घेण्यात आली होती़ त्यातही घरकुलांचा मुद्दा चांगलाच चर्चेस आला होता़
‘रमाई’चे अर्ज पंचायत समितीतच पडून : नंदुरबारात 319 घरकुलांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 5:29 PM