शहाद्यात अल्पवयीन युवतीवर दोघांकडून बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:15 PM2018-07-12T12:15:56+5:302018-07-12T12:16:04+5:30
शहादा तालुक्यातील घटना : एकाने पळवून नेण्याचा केला प्रयत्न
नंदुरबार : 16 वर्षीय अल्पवयीन युवतीवर एकाने बलात्कार करत तिच्या कुटूंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली तर दुस:याने तिच्या असाहयतेचा फायदा घेत बलात्कार करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला़ खैरवे ता़ शहादा येथे हा प्रकार डिसेंबर 2017 व जून आणि जुलै 2018 मध्ये हा प्रकार घडला़
खैरवे येथील 16 वर्षीय युवतीवर डिसेंबर 2017 मध्ये समाधान विक्रम भिल ऱा़ खैरवे याने लगAाचे अमिष दाखवत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला होता़ यादरम्यान युवतीच्या वडीलांना हा प्रकार समजून आल्यानंतर समाधान याने युवतीसह तिच्या वडीलांना धमकी दिली होती़ या प्रकारानंतर भडगाव येथील प्रविण ईश्वर कोळी या दुकानदाराने युवतीला पैशाचे अमिष दाखवत जून 2018 मध्ये वेळावेळी अत्याचार केला होता़ किराणा दुकानात झालेल्या या घटनेनंतर त्याने तिला 9 जुलै रोजी खैरवे गावातून बामखेडा गावाकडे जाणा:या मार्गावर थांब असे सांगून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता़ यावेळी त्याने तिला लगAाचे अमिष दिले होत़े दुपारी 1 वाजेच्या सुमारास युवती पुलावर येऊनही प्रविण कोळी हा आला नाही़ यातून हतबल झालेल्या युवतीने हा प्रकार कुटूंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी विचारविनिमय करून पोलीसात धाव घेतली़
याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून समाधान विक्रम भिल आणि प्रविण ईश्वर कोळी या दोघांविरोधात सारंगखेडा पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे सरंक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल आह़े यातील एकाविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आह़े
तपास शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पी़एऩमेढे करत आहेत़