महावितरणच्या शहादा उपविभागाकडून वसुली मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:29 PM2018-01-25T12:29:01+5:302018-01-25T12:29:08+5:30

Recovery campaign from Shahada subdivision of MSEDCL | महावितरणच्या शहादा उपविभागाकडून वसुली मोहीम

महावितरणच्या शहादा उपविभागाकडून वसुली मोहीम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : आर्थिक वर्ष संपण्यास काहीच दिवस शिल्लक आह़़े त्यामुळे महावितरणकडूनही लक्षांकपूर्तीसाठी आता वसुलीवर जोर देत शेतक:यांच्या मागे तगादा लावण्यात येत आह़े महावितरणच्या शहादा उपविभागाकडून पाणीपुरवठय़ाच्या थकीत बिलांची वसुली करण्यात येत आह़े
शहादा उपविभागात पाच कोटी दोन लाख रुपयांची पाणीपुरवठय़ाचे वीज बिल थकीत आहेत़ त्यामुळे या थकबाकीदारांकडून आता बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचा:यांची पथकेही स्थापन करण्यात आली आह़े काही शेतक:यांच्या शेतातील पाणीपुरवठादेखील खंडीत करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़े
आर्थिक वर्ष संपण्याला अवघे काही दिवस बाकी आहेत़ या पाश्र्वभूमिवर शासनाच्या सर्वच विभागाकडून आपले ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात येत असत़े 
महावितरणकडून यासाठी अधिकारी व कमचा:यांची पथकेही स्थापन करण्यात आली आहेत़ मागील वर्षी महाविरणकडून वसुलीचाच एक उपक्रम म्हणून ढोल वाजवून वसुली करण्याचा आगळावेगळा उपक्रमदेखील हाती घेण्यात आला होता़ ज्या शेतक:यांची कृषिपंपाची बिले, पाणीपुरवठय़ाची बिले थकीत आहे अशा थकबाकीदारांच्या घरासमोरच ढोल वाजवण्यात  आले होत़े याही वर्षी महावितरणकडून वसुलीसाठी            कुठल्या गोष्टींचा अवलंब करण्यात येतो हे बघणे महत्वाचे ठरणार              आह़े 
महावितरणच्या शहादा उपविभागात शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव असे चार तालुके येतात़ 625 ग्रामपंचायतींना महावितरणमार्फत पाणीपुरवठय़ाची कनेक्शन दिले आह़े शहादा तालुक्यातील 3 कोटी 60 लाख, अक्कलकुव्यात 30 लाख 35 हजार, धडगाव येथे 5 लाख 12 हजार तर तळोद्यात 1 कोटी 5 लाख असे एकूण चार तालुके मिळून पाच कोटी 2 लाख रुपयांची पाणीपुरवठय़ाची थकबाकी आह़े त्याच प्रमाणे हे चारही तालुके मिळून पथदिव्याचीदेखील 97 लाख 13 हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळाली़ त्यात, शहादा येथील 221 गावे, तळोद्यातील 92 गावे, अक्कलकुवा येथील 112 गावे तर धडगाव येथील 239 गावांचा समावेश आह़े 
यासर्व ग्रामपंचायतींना बिल भरण्याबाबत नोटीसादेखील पाठविण्यात आल्या आहेत़ येत्या काही दिवसात बिल न भरल्यास वीजपुरवठा तसेच पाणीपुरवठा  खंडीत करण्याची कारवाई               करण्यात येईल असे सांगण्यात          आल़े
कृषिपंपाचीही थकबाकी.
कृषिपंपाची वीज बिल वसूल करण्यासाठीही शेतक:यांना वेठीस धरण्यात येत आह़े शहादा उपविभागाअंतर्गत थकबाकीधारकांच्या एक हजार 200 कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात आली आह़े 

Web Title: Recovery campaign from Shahada subdivision of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.