ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नंदुरबार : पालिकेचे कामकाज आता डिजीटल होणार असून आतार्पयतचे सर्व कागदपत्रांचा डाटा सुरक्षित करणे व त्याचे डिजीटलायङोशन करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाच्या विषयाला आणि होणा:या खर्चाला बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. सभेत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी अध्यक्षा र}ा रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत विषय पत्रिकेवर एकुण 15 विषय होते. त्या सर्व विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. सध्या सर्वत्र ऑनलाईनचा जमाना आहे. पालिकेने देखील अनेक सेवा ऑनलाईन केलेल्या आहेत. ब:याच विभागांचे संगणकीकरण झालेले आहे. आता जुन्या कागदपत्रांचे डिजीटलायङोशन करण्यात येणार आहे. जुने आणि जिर्ण झालेल्या कागदपत्रांना सांभाळणे मोठे जिकरीचे काम असते. त्यामुळे अशा कागदपत्रांचे डिजीटलाङोशन करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी लागणा:या अंदाजीत खर्चाला सभेत मंजुरी देण्यात आली.बैठकीत इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली. पालिका क्षेत्रात लावण्यात येणारे व्यावसायिक बोर्ड, बॅनर्स, फलक यांच्या जाहिरात कर व भाडे वसुली यासाठी अभिकर्ताची नेमणूक करण्यात येणार आहे.पालिकेने नुकतीच सुरू केलेल्या ई-लायब्ररी चालविण्यासाठी आता अभिकर्ता नियुक्त करण्यात येणार आहे. या लायब्ररीची देखभाल दुरूस्ती व परिक्षण या माध्यमातून करण्यात येणार आहे. हीच पद्धत नाटय़ मंदीराशेजारील बगिचा देखभाल व दुरूस्ती आणि परिक्षण करण्यासाठी देखील अभिकर्ता नेमण्यात येणार आहे. पालिका हद्दीतील सर्वच मतदारांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. त्याच्या अंदाजीत खर्चाला देखील यावेळी मंजुरी देण्यात आली. पालिकेने वैशिष्टयेपुर्ण योजनेअंतर्गत सव्र्हे नंबर 271 पैकी जागेत ट्रक टर्मिनन्स मंजुर अंदाजपत्रकाव्यतिरिक्त बचत झालेल्या रक्कमेतून इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्या कामांबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. 2016-17 या आर्थिक वर्षाचा एप्रिल ते जून अखेर जमा आणि खर्चाचा तिमाही हिशोबला मंजुरी देण्यात आली. याशिवाय इतरही विविध विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, सर्व विषय समिती सभापती, मुख्याधिकारी गणेश गिरी उपस्थित होते.
पालिका रेकॉर्डचे संगणकीकरण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:46 AM
सर्वसाधारण सभा : विविध विषयांना मंजुरी, पुढची सभा अखेरची ठरणार
ठळक मुद्देआणखी एक किंवा दोन सभा. पालिका निवडणुकीची आचारसंहिता साधारणत: ऑक्टोबरच्या दुस:या आठवडय़ापासून लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेची यापुढील सर्वसाधारण सभा ही शेवटची सभा राहण्याची शक्यता आहे. आज सभा झाल्यानंतर किमान दोन महिन्यात सभा घेणे आवश्यक असते. परंतु