बडवानी जिल्हा न्यायाधीश दिनेशचंद थपलियाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तालुकास्तरावर लोकअदालतींचे आयोजन करण्यात आले होते. खेतिया येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीला खेतियाचे न्यायाधीश विशाल खाडे, प्रांताधिकारी सुमेरसिंह मुजाल्दे, तहसीलदार राकेश सस्तिया, आदी उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी न्यायाधीश विशाल खाडे यांनी सांगितले की, लोकअदालत हे एक साधे आणि सुलभ साधन आहे, जिथे अनेक प्रकरणे परस्पर समन्वयाने सोडवली जातात. पक्षकारांनी लोकअदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या लोकअदालतीत ११० प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात विविध बँकांची प्रकरणे आणि नगर पंचायतीची प्रकरणे सोडविल्यानंतर २५ लाख ९७ हजार रक्कम प्राप्त झाली. यावेळी खेतिया व पानसेमल नगरपंचायतीचे व परिसरातील बँकांचे प्रतिनिधी, न्यायालयीन कर्मचारी व वकील उपस्थित होते.
खेतिया येथे लोकअदालतीत ११० प्रकरणांचे निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:35 AM