निरोगी आरोग्यासाठी व्यसनमुक्तीचा संकल्प : ठाणाविहिर येथे मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 04:50 PM2017-12-06T16:50:34+5:302017-12-06T16:50:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मोदलपाडा : दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आह़े त्याच प्रमाणे अमलीपदार्थाच्या सेवनाने वर्तमान काळातील तरूणाईचा सर्व अंगाने नुकसान होत आह़े त्यामुळे तरुणाईने निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन संतोष महाराज यांनी केल़े
अक्कलकुवा तालुक्यातील ठाणाविहिर येथे व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होत़े त्यावेळी ते बोलत होत़े मेळाव्यात गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र येथील सीमावर्ती भागांतील सुमारे दहा हजार आदिवासी भाविक उपस्थित होते.
याप्रसंगी संतोष महाराज यांनी मेळाव्यात पुढे बोलतांना सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना दारूच्या व्यसनापासून परावृत्त करण्याचे काम माङो वडील शेषराव महाराज यांनी केले त्यांच्या पश्चात त्यांचा वारसा गेल्या 17 वर्षापासून अखंडपणे सुरु ठेवण्याचे काम करण्यात येत आह़े याहीपुढे आदिवासी समाजाची सेवा करून त्यांना विविध व्यसनांपासून मुक्त करण्याचे काम आपण करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े
व्यसनामुळे कधीही कोणाचे भले झाले नाही, ऊलट नुकसानच झाले आह़े त्यामुळे दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, गांजा, विडी, या व्यसनांपासून आदिवासी बांधवांनी दूर राहावे असेही यावेळी त्यांनी आवाहन केले.दारू सोडविण्यासाठी आलेल्या सुमारे दोनशे जणांना ओम नम: शिवाय चा महामंत्राने शपथ देण्यात आली़ उपस्थितांनी आपले हात उंच करून व्यसनमुक्तीचा संकल्प केला़ मेळाव्याची सुरुवात गावात सकाळी दिंडी काढून करण्यात आली. मेळाव्यात भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप वसावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसाव, गुजरातमधील व्यसनमुक्ती समितीचे रतिलालभाई महाराज, नवापुरचे शिरीषभाई करंजलीकर, देवमोगरामाता मंदिरचे कोषागार हिरालालभाई, जर्मनसिंग वळवी, घनश्याम पाडवी, यशवंत नाईक, जयमल पाडवी, भूषषण पाडवी, भूपेंद्र पाडवी, रमेश महाराज, रामसिंग गुरूजी किशोर मराठ,े मनोज सोनार, उपस्थित होत़े या व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन ठाणाविहीर गावातील व्यसनमुक्ति समितीचे अशोक पाडवी , जयवंत नाईक, शंकर कोठारी, अभिमन्यू पाडवी, अशोक वसाव, शांताराम नाईक, कांतीलाल नाईक, जयवंत गुरूजी आदींनी केले होत़े