जिल्ह्यातील बदलेल्या राजकीय समिकरणात झालेल्या निवडणुकांचा निकाल देखील ठरले उत्कंठावर्धक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:56 AM2019-10-25T10:56:49+5:302019-10-25T10:56:56+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजप व काँग्रेसने आपल्या जागा कायम राखल्या. या निवडणुकीत पक्षांतर झाल्याने ...

The result of the elections in the changed political equation in the district was also exciting! | जिल्ह्यातील बदलेल्या राजकीय समिकरणात झालेल्या निवडणुकांचा निकाल देखील ठरले उत्कंठावर्धक!

जिल्ह्यातील बदलेल्या राजकीय समिकरणात झालेल्या निवडणुकांचा निकाल देखील ठरले उत्कंठावर्धक!

Next

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भाजप व काँग्रेसने आपल्या जागा कायम राखल्या. या निवडणुकीत पक्षांतर झाल्याने राजकीय समिकरणे बदलली होती. त्यामुळे निकाल देखील धक्कादायक लागतील असे बोलले जात होते. तसे चित्रही रंगविण्यात आले. परंतु मतदारांनी बदललेल्या राजकीय समिकरणांना बाजूला सारत गेल्या निवडणुकीतील जागा दोन्ही प्रमुख पक्षांना कायम ठेवल्या. दरम्यान,  नंदुरबारात भाजप उमेदवाराने एकतर्फी विजय मिळविला. नवापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराने ब:यापैकी मताधिक्य मिळविले तर शहादा व अक्कलकुवा मतदारसंघातील विजय हे निसटतेच म्हणावे लागतील.  
जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील निवडणूक निकालाबाबत कुणीही ठामपणे अंदाज वर्तवित नव्हते. त्यामुळे निकालाची प्रचंड उत्सूकता लागून होती. बुधवार निकालाचा दिवस उजाडला. सकाळी साडेआठ वाजेपासून निकालाच्या आकडेवारी बाहेर येवू लागल्या तसे उमेदवार, कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांमधील चलबिचलता वाढत गेली. केवळ नंदुरबार मतदारसंघाचा निकालाच्या फे:या केवळ एकतर्फी जाहीर होत होत्या. परंतु नवापूर, शहादा आणि अक्कलकुवा मतदारसंघातील निकालच्या फे:या वारंवार बदलणा:या आकडेवारीमुळे रंगतदार ठरत होत्या. 
सर्वात प्रथम नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहिर झाला़ सकाळी 11़30 वाजेर्पयत निकाल समोर आला़ आमदार विजयकुमार गावीत हे विजयी झाल्यानंतर त्यांचे समर्थक आणि भाजपाचे कार्यकर्ते खोडाई माता रस्त्यावरील गावातांच्या निवासस्थानासमोर जमू लागले होत़े
नंदुरबारातील जागा भाजपने पटकावल्यानंतर दुसरा निकाल शहाद्याचा जाहिर झाला़ राजेश पाडवी यांच्या विजयाची घोषणा होण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण सुरु केली होती़ त्यांच्या विजयानंतर शहाद्यात त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली़ तळोदा शहरात भाजप समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजय साजरा केला़
नवापुर मतदारसंघात प्रारंभीपासून आघाडी मिळवणा:या शिरीष नाईक यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होण्यापूर्वी नवापुर शहर, विसरवाडी, खांडबारासह धायटे परिसर आणि नवागाव, सुकवेल येथे आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता़ 
जिल्ह्यातील अंतिम निकाल हा अक्कलकुवा मतदारसंघाचा लागला़ शिवसेनेचे आमशा पाडवी आणि कॉग्रसेचे अॅड़ क़ेसी़पाडवी यांच्यातील लढतीत अॅड़ पाडवी यांनी बाजी मारली असली तरी संपूर्ण निकाल हाती येईर्पयत समर्थकांची घालमेल कायम होती़ निकाल ऐकण्यासाठी 20 हजारपेक्षा अधिक लोक उपस्थित होत़े

च्अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल हा उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ठरला़ प्रत्येक फेरीनंतर उमेदवार एकमेकांवर मात करत मतांचा लीड घेत होत़े यातून काँग्रेस आणि शिवसेना समर्थक गोंधळात पडले होत़े शेवटच्या काही फे:या शिल्लक असताना शिवसेनेचे आमशा पाडवी विजयी झाल्याचे समर्थकांमध्ये सांगण्यात आल़े यावेळी काही अतीउत्साही कार्यकर्ते फटाके घेत उंच जागी गेल़े परंतू पाडवी हे निवडले नसल्याचे सांगितल्यानंतर ते पुन्हा फटाक्यांसह परत यावे लागल्याने त्यांचे चेहरे पडले होत़े 

गावीतांकडे ट्रॅफिक जाम 
च्नंदुरबारचे विजयी उमेदवार विजयकुमार गावीत हे मोठय़ा मताधिक्क्याकडे पोहोचल्यानंतर त्यांच्या घरासमोर समर्थकांची गर्दी उसळली होती़ हमरस्त्यावर असलेल्या त्यांच्या घरासमोर वाहने आणि समर्थक उभे असल्याने वाहतूकीची कोंडी झाली़  
च्काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नंदुरबार शहरातील आमदार कार्यालयात सकाळी बरीच गर्दी होती़ परंतू शिवेसेनेचे उमेदवार आमशा पाडवी हे पराभूत झाल्याचे वृत्त आल्यानंतर दुपारपासून येथील गर्दी ओसरून पूर्णपणे शुकशुकाट पसरला होता़  

पावसामुळे धरला परतीचा मार्ग च्श

मतदारसंघातील मतपेटय़ा ह्या शहराबाहेरील नवीन तहसील कार्यालयाच्या आवारात झाल़े याठिकाणी केवळ 
मोजक्या लोकांना प्रवेश असल्याने समर्थकांसह काँग्रेस आणि भाजप पदाधिकारी खेतिया बायपासच्या दुतर्फा थांबून होत़े यादरम्यान पावसाला सुरुवात झाल्याने उपस्थितांची चांगलीच धांदल उडाली़ काहींनी जवळच निवारा शोधला होता़ सुमारे अर्धातास पाऊस सुरु असल्याने अनेकांनी घराकडे परतणे पसंत केले होत़े पाऊस थांबल्यानंतर पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा गर्दी वाढण्यास सुरुवात झाली होती़ 
 

Web Title: The result of the elections in the changed political equation in the district was also exciting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.