भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या 47 वर्षापासून प्रलंबित असलेला वनगावांचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने मार्गी लावला असून धडगाव तालुक्यातील 63 वनगावांना महसूली गावांचा दर्जा देण्यात आला आह़े यासाठी शासनाने अधिसूचना काढली असून निर्णयामुळे या गावांचे ग्रामस्थ मूळ प्रवाहात येणार आहेत़ धडगाव तालुक्यातील 63 गावे 1966 च्या जमीन महसूल कायद्यानुसार महसूली गावे म्हणून ओळखली जात होती़ दरम्यान 1971 साली केंद्रशासनाने वनजमिन अधिनियम संरक्षण कायदा पारित केला होता़ या कायद्यामुळे वन विभागाच्या जमिनीवर असलेल्या 63 गावांची महसूली गाव सनद रद्द करण्यात येऊन त्यांना वनगावे म्हणून घोषित करण्यात आले होत़े शासनाच्या या एका निर्णयामुळे गेल्या 47 वर्षापासून स्वमालकीची शेती, घर, शाळा, भौतिक सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांपासून येथील नागरिक दुरावले होत़े ही गावे पुन्हा महसूली व्हावीत यासाठी येथील ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता़ या पाठपुराव्याला 17 नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद देत थेट अधिसूचनाच काढून सर्व 63 गावांना महसूली दर्जा दिला आह़े धडगाव तालुक्यात एकूण 99 महसूली गावे आहेत़ यात आता 63 गावांचा समावेश झाल्याने ही संख्या 162 झाली आह़े तालुक्यात एकूण 73 वनगावांचा प्रश्न प्रलंबित होता़ यातील 10 गावांच्या महसूली हद्दीचाच प्रश्न होता़ हा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावला आह़े या गावांमध्ये निर्माण करण्यात येणा:या पायाभूत सोयी सुविधांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आह़े धडगाव तालुक्यातील जर्ली, केलीमोजरा, शिरसाणी, निगदी, राजबर्डी, कामोद बुद्रुक, कात्रा, चिखली, तेलखेडी, सिंदवाणी, बिलगाव, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, कुकलट, शेलकुवी, बिजरी, वावी, गौ:या, साव:या दिगर, खर्डी बुद्रुक, डोमखेडी, भूषा, थुवाणी, अकवाणी, मक्तारङिारा, शेलगदा, चांदसैली, खडकाळे बुद्रुक, आट्टी, केली, झुम्मट, लेखडा, पिंपळबारी, शिक्का, पिंपळचौक, वरवली, साव:या, फलाई, जुनवणे, शेलदा, सादरी, भमाणे, गेंदा, सिंदीदिगर, गोराडी, खडकाळे खुर्द, भामरी, मनखेडी खुर्द, टेंभुर्णी, खर्डी बुद्रुक, बोरी, सूर्यपूर (छिनालकुवा), बोदला, रोषमाळ खुर्द, कुंभरी, त्रिशुल, भरड, कुवारखेत, वलवाल, खडकी, चिंचकाठी, कामोद खुर्द आणि माळ या गावांचा महसूली गावे म्हणून समावेश करण्यात आला आह़े शासनाकडून एकीकडे महसुली गावे म्हणून वनगावांना दर्जा देत असताना शहादा तालुक्यात दोन नवीन गावे निर्माण करण्यात आली आहेत़ या गावांना महसूलचा दर्जा देण्यात आला आह़े शहादा तालुक्यातील विरपूर आणि दरा या दोन गावांमधून चिंचोरा हे तर काथर्दे दिगर या गावापासून काही अंतरावर असलेल्या सरदार सरोवर बाधितांच्या वसाहतीला नर्मदानगर असे नाव देऊन महसूली गावाचा दर्जा देण्यात आला आह़े चिंचोरा गावाची निर्मिती ही लोकसंख्येनुसार झाली आह़े या नवीन गावाचे क्षेत्र हे 183़73 हेक्टर राहणार आह़े यात शेतीसाठी 174 हेक्टर जमीन देण्यात आली आह़े महसूली म्हणून वर्ग झालेल्या 63 गावांच्या विविध नोंदींची कारवाई महसूल स्तरावर सुरु आह़े येत्या काही दिवसात येथील शेतक:यांना सातबारे मिळणार आहेत़ यातून बँकांकडून मिळणा:या विविध कर्जाच्या योजनांना हे शेतकरी पात्र ठरणार आहेत़
धडगाव तालुक्यातील 63 वनगावांना महसूलचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:27 PM