नंदुरबारलगतच्या गावांसह ११ गाव पाणी पुरवठा योजना साकारणार आढावा बैठक, खासदार डॉ. हीना गावित यांची दिल्या अधिकाऱ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:35 AM2021-09-12T04:35:04+5:302021-09-12T04:35:04+5:30
जिल्ह्यातील दुधाळे, होळ, पातोंडा, वाघोदा, रनाळा, शनिमांडळ, सारंगखेडा, प्रकाशा, खापर, अक्कलकुवा, लोणखेडा अशा ११ गावांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध ...
जिल्ह्यातील दुधाळे, होळ, पातोंडा, वाघोदा, रनाळा, शनिमांडळ, सारंगखेडा, प्रकाशा, खापर, अक्कलकुवा, लोणखेडा अशा ११ गावांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून या योजना डिसेंबर २०२१ पर्यंत कार्यारंभ आदेश होऊन पूर्णत्वास नेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून ग्रामीण जनतेला याचा लाभ व्हावा यासाठी युद्ध पातळीवर काम करावे, असेही खासदार डॉ. हीना गावित व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी संबंधितांना सूचित केले आहे. शहरालगत पडलेले नवीन प्लॉट्स, नियोजित वसाहतींना या योजनेत सहभागी करून त्यांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीला कार्यकारी अभियंता निकुंभ, उपअभियंता, विविध यंत्रणांचे अधिकारी, रामचंद्र पाटील, हरी पाटील, शरद तांबोळी, जयपाल रावल, शनिमांडळ, तलवाडे, दुधाळे या गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.