ठेकेदाराने मुरुमची वाहतूक केल्याने रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:54 PM2019-01-30T12:54:19+5:302019-01-30T12:54:25+5:30

बांधकाम विभागाचीच रस्ते महामंडळाकडे तक्रार

Road condition of the road due to contractual repair by murmur | ठेकेदाराने मुरुमची वाहतूक केल्याने रस्त्याची दुरवस्था

ठेकेदाराने मुरुमची वाहतूक केल्याने रस्त्याची दुरवस्था

Next

शहादा : मनरद, शिरुड व वर्ढे टेंभा या नूतनीकरण झालेल्या रस्त्यावर अवजड वाहतूक करून रस्त्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या ठेकेदारावर कारवाई करुन दुरवस्था झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी शहादा बांधकाम विभागानेच रस्ते विकास महामंडळकडे लेखी तक्रार केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तालुक्यातील मनरद, शिरुड, टेंभा या रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरणाचे काम नुकतेच झाले आहे.  या रस्त्यावरून विसरवाडी ते खेतिया या रस्त्याचे काम करणा:या ठेकेदाराने 55 ते 60 टन वजनाची ओव्हरलोड वाहने चालवत रस्त्याची दुरवस्था केली आहे. हा रस्ता बनविणारे ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या        ठेकेदारात यावरून जोरदार            शाब्दीक चकमक झाली होती. हायवेच्या ठेकेदाराने रस्ता पुन्हा       दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह मनरद रस्ता तयार करणा:या ठेकेदाराने केली होती. मात्र हायवेच्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती तर दूरच राहिला उलट त्याच्या माणसाने ठेकेदाराच्या एका माणसाला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्या घटनेसंदर्भात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तक्रार मारहाण झालेल्या तक्रारदाराने दिली होती. मात्र पोलिसांनी अजूनही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  मात्र आता शहादा बांधकाम विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास याविरोधात मनरद, शिरुड व वर्ढेटेंभा या तिन्ही गावाच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शिरूर दिगर ते म मनरद व शिरुड ते वर्ढेटेंभा  या दोन रस्त्यांचे काम  करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही रस्ते खराब झाल्याने परिसरातील ग्रामस्थ व शेतक:यांनी या दोन्ही रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार या कामासाठी सुमारे आठ वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय ठेकेदाराकडून या दोन्ही रस्त्याचे काम केले होते. 29 व 30 डिसेंबरला या दोन्ही रस्त्यांच्या नूतनीकरणासह डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने पूर्ण केले. हे दोन्ही रस्ते साधारण दहा-बारा टन वजन असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने ग्रामीण भागात तयार करण्यात आला  होता.            मात्र महामार्गाचे काम करणारा  ठेकेदार या रस्त्यावरून मुरुमची वाहतूक करीत आहे. सुमारे 50 ते 60 टन वजन असलेल्या दिवसातून डंपरच्या 40 ते 50 फे:यांमुळे या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणा:या ठेकेदाराने मनरद, शिरुड, टेंभा या रस्त्याचे रस्त्याचे काम नव्याने करून द्यावे, अशी मागणी  राष्ट्रवादी           काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलाता शितोळे, ठेकेदार पंडित जाधव, जयदीप           गिरासे, दिनेश पाटील, जहीर खान बेलदार केली आहे. ग्रामीण         भागातील रस्त्यांवर अवजड वाहतूक करून मोठय़ा प्रमाणावर नुकसान करणा:या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास याविरोधात मनरद, शिरुड व वर्ढेटेंभा या तिन्ही गावातील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
 

Web Title: Road condition of the road due to contractual repair by murmur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.