कार्यक्रमास प्राचार्या नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, सी. पी. बोरसे, ए. आर. गर्गे उपस्थित होते. वंदना जांबिलसा यांनी पूर्वीच्या काळापासून भारतात हिंदी भाषेचे महत्व व इतिहास मांडला. हिंदी भाषेचा आम्हाला आदर व अभिमान असायलाच हवा. कारण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा असून पूर्वीच्या काळापासून आपल्या देशात या भाषेचा उपयोग होत असल्याने या भाषेचे महत्व जाणले पाहिजे. त्यानंतर शिक्षिका रुचिता सुतार व चंदरलेखा भामरे यांच्यासह मयुरी पाटील, महिराज अहिरे, कल्याणी बडगुजर, ममता पाडवी या विद्यार्थ्यांनी हिंदी कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी ‘दोहे अंताक्षरी’ कार्यक्रमही सादर केला. यामध्ये संत कबीरदास, संत तुलसीदास, संत बिहारी, संत रोहिदास असे विद्यार्थ्यांचे चार गट करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चार फेरीत स्पर्धा झाली. त्यात विद्यार्थ्यांनी संतांचे सुंदर दोहे, विचारलेल्या दोह्यांचा अर्थ, संतांचे नाव ओळख अशा फेऱ्या घेण्यात आल्या. यामध्ये तुलसीदास या गट अग्रेसर राहिला. या गटास प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन वंदना जांबिलसा तर आभार ए. आर. गर्गे यांनी मानले. रुचिता सुतार, जयश्री कदम, सी. पी. चव्हाण, शिल्पा वळवी, पूनम शिंदे, ज्योती राजपूत आदींचे सहकार्य लाभले.
एस. ए. मिशन शाळेत कविता वाचन व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:35 AM