नंदुरबारच्या बैलबाजारात वर्षभरात 254 बैलांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:22 AM2018-12-11T11:22:59+5:302018-12-11T11:23:04+5:30
नंदुरबार : कधीकाळी बैलांच्या खरेदी विक्रीतून होणा:या उलाढालीतून अनेक कुटूंबांची देखभाल करण्यास सहाय्यकारी ठरणारा नंदुरबारचा बैलबाजाराला गेल्या पाच वर्षात ...
नंदुरबार : कधीकाळी बैलांच्या खरेदी विक्रीतून होणा:या उलाढालीतून अनेक कुटूंबांची देखभाल करण्यास सहाय्यकारी ठरणारा नंदुरबारचा बैलबाजाराला गेल्या पाच वर्षात उतरती कळा लागली आह़े यातून यंदाच्या वर्षात केवळ 254 बैलांची विक्री झाली आह़े
नंदुरबार बाजार समितीच्या आवारात मंगळवारी भरणा:या आठवडे बाजाराच्या दिवशी बैलबाजार भरवण्याची प्रथा आह़े पूर्वी शहरातील हाटदरवाजा भागात हा बाजार भरवला जात होता़ कालांतराने बाजार समितीची निर्मिती झाल्यावर याच परिसरात बैल बाजार सुरु करण्यात आला़ जिल्हानिर्मितीनंतर गुजरातसह धुळे जिल्ह्यातून येणारे बैलविक्रेते आणि व्यापारी यांच्या वावरामुळे येथे प्रत्येक आठवडय़ाला साधारण 200 बैलांची विक्री होऊन त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत होती़ परंतू गेल्या 2010 नंतर या बाजारातील व्यवहारांना घरघर लागून बैलांची आवक कमी झाली आह़े यातून गेल्या आठ वर्षात बाजाराची स्थिती कमकुवत झाली आह़े पारंपरिक शेतीत बैलांचे महत्त्व कायम असल्याने जिल्ह्यातील तळोदा आणि अक्कलकुवा येथील बैलबाजार आजही स्थान टिकवून असताना नंदुरबार बैल बाजाराची स्थिती कमकुवत झाल्याने त्यावर उदरनिर्वाह करणा:या व्यापा:यांचे आर्थिक गणित पुरते बिघडले आह़े
बैलबाजारात बैलांची आवक होत नसल्याने शेतक:यांना जादा रक्कम खर्च करुन इतर शहरात जाऊन बैलांची खरेदी करावी लागत आह़े या बाजारातच विविध ठिकाणाहून चांगली क्षमता असलेले बैल विक्रीसाठी आल्यास शेतक:यांचा त्याला प्रतिसाद मिळणार आह़े नंदुरबार बाजार समितीत दर मंगळवारी भरवल्या जाणा:या बाजारात 1 जानेवारी ते 4 डिसेंबर या कालावधीत एकूण 675 बैलांची आवक झाली होती़ यातून केवळ 254 बैलांची विक्री झाली आह़े यातून 3 कोटी 65 लाख 5 हजार 900 रुपयांची उलाढाल झाली होती़ या बाजारात गावठी बैल येत नसल्याने उलाढीवर परिणाम झाल्याची माहिती आह़े केवळ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून बैल याठिकाणी विक्रीस येतात़ यंदाच्या वर्षात सर्वाधिक 45 हजार रुपये किमतीची बैलजोडी विक्रीस गेल्याची माहिती आह़े बाजार समिती सर्व प्रकारच्या सुविधा असल्या तरी बैलांची आवकच होत नसल्याने बैल बाजार इतिहास जमा होण्याकडे वाटचाल करत आह़े दर आठवडय़ाला आवक होणा:या 20 बैलांपैकी पाच ते सात बैलांची विक्री होत असल्याची स्थिती येथे निर्माण झाली आह़ेएकीकडे बैल बाजाराला घरघर लागली असताना दुसरीकडे शेळ्या आणि मेंढय़ाचा बाजार येथे तग धरुन आह़े नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात मंगळवारी विक्रीसाठी आणले जाणारे बोकड, शेळ्या आणि मेंढय़ा ह्या गावठी वाणाच्या असल्याने त्यांची खरेदी करण्यासाठी गुजरात राज्यातील पशुपालक येथे हजेरी लावतात़ चालू वर्षात साधारण 1 हजार 100 शेळ्या-मेंढय़ांची विक्री झाल्याची माहिती आह़े आठवडय़ाला 200 शेळ्यांपैकी 180 शेळ्या ह्या तात्काळ विक्री होत असल्याने पशुपालक याठिकाणी न चुकता हजेरी लावतात़ सकाळी 8 वाजेपासून याठिकाणी शेळीवर्गीय पशु घेण्यासाठी व्यापारी गर्दी करतात़