स्कूल चले नही स्कूलसे दूर है हम..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:50 PM2018-12-16T12:50:34+5:302018-12-16T12:50:41+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्थलांतरीत विद्याथ्र्याच्या शिक्षणाची परवड थांबण्याऐवजी दरवर्षी वाढतच चालली आहे. आता शाळाबाह्य विद्याथ्र्याची आकडेवारी देखील त्यात भर घालत आहे. जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन हजार विद्यार्थी शाळाबाह्य आढळले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे सपाटीवरील आणि विकसीत असलेल्या शहादा व नंदुरबार तालुक्यात ही संख्या सर्वाधिक आहे. सव्र्हेक्षणात दीडशे विद्याथ्र्यानी कधीही शाळेचे तोंड पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले.
शिक्षण हमी कायदा अर्थात आरटीई अंतर्गत एकही बालक शाळेपासून वंचीत राहू नये असा शासनाचा उद्देश आहे. परंतु शाळेपासून दूर असलेल्या अशा बालकांची संख्या कायमच आहे. समग्र शिक्षा अभियान, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक संस्था यांनी चालू शैक्षणिक वर्षात केलेल्या सव्र्हेत तब्बल 2,754 बालके ही शाळाबाह्य आढळून आली आहेत.
शहादा तालुक्यात सर्वाधिक बालके
शाळाबाह्य बालकांमध्ये सर्वाधिक बालके ही शहादा तालुक्यात आढळून आली आहेत. तर कधीही शाळेत न गेलेल्या बालकांची संख्या धडगाव तालुक्यात 142 इतकी आहे. शहादा तालुक्यात 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहिलेल्या शाळाबाह्य विद्याथ्र्याचा विचार करता तब्बल 1,395 बालके आढळून आली. त्यात 720 मुले तर 675 मुली आहेत. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात 846 विद्यार्थी आढळली. त्यात 427 मुले, 419 मुलींचा समावेश आहे.
धडगाव तालुक्यात 134 मुलं तर 147 मुली असे एकुण 281 विद्यार्थी. नवापूर तालुक्यात 13 मुलं तर आठ मुली असे एकुण 21, तळोदा तालुक्यात 105 मुलं व 89 मुली असे एकुण 194, अक्कलकुवा तालुक्यात सहा मुलं व 11 मुली असे एकुण 17 विद्याथ्र्याचा समावेश आहे.
शाळेचे तोंड न पाहिलेले..
कधीही शाळेचे तोंडही न पाहिलेले 147 बालके देखील जिल्ह्यात आढळून आली आहेत. त्यात एकटय़ा धडगाव तालुक्यात 142 बालकांचा समावेश आहे. त्यात 72 मुलं व 70 मुलींचा समावेश आहे. तळोदा तालुक्यात तीन बालके आढळून आली. त्यात दोन मुलं व एका मुलीचा समावेश आहे.
शाळेत आणण्यासाठी प्रय}
शाळाबाह्य विद्याथ्र्याना शाळेत आणण्यासाठी विविध माध्यमातून प्रय} सुरू आहेत. महिनाभरापेक्षा अधीक काळ गैरहजर राहिलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणण्यासाठी देखील त्या त्या परिसरातील शाळांमधील शिक्षकांची पायपीट सुरू आहे. सुदैवाने पूर्वीसारख्या आता शाळा बंद राहण्याचे प्रमाण कमी झाल्याने शाळाबाह्य विद्याथ्र्याची संख्या कमी होत आहे.