चिंचपाडा विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 05:29 PM2018-02-19T17:29:03+5:302018-02-19T17:29:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी क्रितीका संदीप वसावे हिने ह्यमॉस्किटो फ्लाईज आणि फ्रुट फ्लाईज ट्रॅपरह्ण हे उपकरणाची धुळे येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते. या उपकरणाची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे.
वाढत्या अस्वच्छतेमुळे अनेक डासांची निर्मिती होत असून, त्यापासून बचाव करण्याकरीता बाजारात मिळणारे मॉस्किटो कॉईल, लिक्वड आणि पेपर कॉईल उपलब्ध आहेत. ह्या कॉईल्स ह्यस्लो पॉइझनह्ण म्हणून कार्य करत आहे. या समस्येवर उपाय म्हणून मॉस्किटो ट्रॅपर ही एक नैसर्गिक पद्धत असून, सौर ऊज्रेवर चालणारे उपकरण असल्याने मानवी आरोग्य व पर्यावरणाला कोणताही धोका नाही.
पावसाळ्यात तसेच स्वयंपाक घरात नेहमी ओलसरपणा असल्याने मोठय़ा प्रमाणात माश्यांची निर्मिती होते. या माशा घाणीवर, विष्टेवर बसल्याने यांना माक्रोऑरगॅनिझम चिटकून अन्नावर बसल्यास टायफाईड, कॉलरा, पोलिओमेलिटीस सारखे आजार होतात. त्याचप्रमाणे शेतकरी फळबाग, फळभाज्यांची लागवड करतो. फळ माशांमुळे पिकांचे नुकसान होते. नुकसान थांबण्यासाठी शेतकरी मोठय़ा प्रमाणात घातक रासायनिक द्रव्यांचा उपयोग करत आहे. ही रसायने ह्यस्लो पॉइझनह्ण म्हणून काम करत असून, मानवी आरोग्य मोठय़ा संकटात सापडले आहे.
या समस्येवर उपाय म्हणून फ्रुट फ्लाईज ट्रॅपर हे उपकरण नैसर्गिक पद्धतीचे असून, सौर ऊज्रेवर चालणारे अल्प खर्चिक असून, याचा मानवी व पर्यावरणाला कोणताही धोका नाही.
हे उपकरण तयार करण्यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक एम.जे. देवरे, ए.एस. पाडवी यांनी मार्गदर्शन केले. य्ौ उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवार्डसाठी निवड करण्यात आली आहे. विद्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, प्राचार्या सुहासिनी नटावदकर, वनवासी विद्यालयाचे प्राचार्य जी.एन. पवार, पर्यवेक्षक व्ही.एस. वसईकर, विज्ञान मंडळ, शिक्षक, कर्मचा:यांनी कौतुक केले.