शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

चिंचपाडा विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरावर निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 5:29 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी क्रितीका संदीप वसावे हिने ह्यमॉस्किटो फ्लाईज आणि फ्रुट फ्लाईज ट्रॅपरह्ण हे उपकरणाची धुळे येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते. या उपकरणाची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे.वाढत्या अस्वच्छतेमुळे अनेक डासांची निर्मिती होत असून, त्यापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी क्रितीका संदीप वसावे हिने ह्यमॉस्किटो फ्लाईज आणि फ्रुट फ्लाईज ट्रॅपरह्ण हे उपकरणाची धुळे येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते. या उपकरणाची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे.वाढत्या अस्वच्छतेमुळे अनेक डासांची निर्मिती होत असून, त्यापासून बचाव करण्याकरीता बाजारात मिळणारे मॉस्किटो कॉईल, लिक्वड आणि पेपर कॉईल उपलब्ध आहेत. ह्या कॉईल्स ह्यस्लो पॉइझनह्ण म्हणून कार्य करत आहे. या समस्येवर उपाय म्हणून मॉस्किटो ट्रॅपर ही एक नैसर्गिक पद्धत असून, सौर ऊज्रेवर चालणारे उपकरण असल्याने मानवी आरोग्य व पर्यावरणाला कोणताही धोका नाही.पावसाळ्यात तसेच स्वयंपाक घरात नेहमी ओलसरपणा असल्याने मोठय़ा प्रमाणात माश्यांची निर्मिती होते. या माशा घाणीवर, विष्टेवर बसल्याने यांना माक्रोऑरगॅनिझम चिटकून अन्नावर बसल्यास टायफाईड, कॉलरा, पोलिओमेलिटीस सारखे आजार होतात. त्याचप्रमाणे शेतकरी फळबाग, फळभाज्यांची लागवड करतो. फळ माशांमुळे पिकांचे नुकसान होते. नुकसान थांबण्यासाठी शेतकरी मोठय़ा प्रमाणात घातक रासायनिक द्रव्यांचा उपयोग करत आहे. ही रसायने ह्यस्लो पॉइझनह्ण म्हणून काम करत असून, मानवी आरोग्य मोठय़ा संकटात सापडले आहे.या समस्येवर उपाय म्हणून फ्रुट फ्लाईज ट्रॅपर हे उपकरण नैसर्गिक पद्धतीचे असून, सौर ऊज्रेवर चालणारे अल्प खर्चिक असून, याचा मानवी व पर्यावरणाला कोणताही धोका नाही.हे उपकरण तयार करण्यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक एम.जे. देवरे, ए.एस. पाडवी यांनी मार्गदर्शन केले. य्ौ उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर अ‍ॅवार्डसाठी निवड करण्यात आली आहे. विद्यालयाने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, प्राचार्या सुहासिनी नटावदकर, वनवासी विद्यालयाचे प्राचार्य जी.एन. पवार, पर्यवेक्षक व्ही.एस. वसईकर, विज्ञान मंडळ, शिक्षक, कर्मचा:यांनी कौतुक केले.