लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धुळवद, ता.नंदुरबार येथील ४७ वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा उपचार घेतांना बुधवारी सकाळी मृत्यू झाला. याशिवाय तोरखेडा येथील बाधीत रुग्णाच्या संपर्कातील ७२ वर्षीय व्यक्तीचा देखील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. या रुग्णाचा स्वॅब अहवाल येण्याचा बाकी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधीत मृत्यूंची संख्या सात झाली आहे.धुळवद येथील ४७ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधीत झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात उपचार सुरू होता. बुधवारी पहाटे त्यांना श्वास घेण्यास अधीक त्रास जाणवू लागला. सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. या रुग्णाच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत मृत्यूसंख्या आता सात झाली आहे.याशिवाय तोरखेडा, ता.शहादा येथील रुग्ण धुळे येथे पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाच्या संपर्कातील ७२ वर्षीय व्यक्तीला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी त्यांचाही मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी त्यांचा स्वॅब अहवाल येण्याचा बाकी असल्यामुळे संशयीत म्हणून त्यांची नोंद आहे.दोन्ही मयतांवर बुधवारी दुपारी कोविड नियमावलीनुसार नंदुरबारात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोरोनाबाधीतासह संशयीताच्या मृत्यूने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:24 PM