लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत व सर्वरोगनिदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ.हीना गावीत यांनी केले. अध्यक्षस्थानी आमदार सुरुपसिंग नाईक होते तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरसेविका सारीका पाटील, बबीता वसावे, भाजपचे जिल्हा चिटणीस एजाज शेख, तालुकाध्यक्ष प्रदीप वळवी, शिवसेना तालुका प्रमुख गणेश वडनेरे, जिल्हा दक्षता समिती सदस्य जयंतीलाल अग्रवाल, घनशाम परमार, जाकीर पठाण, समीर दलाल, दिनकर गावीत, कल्पेश अग्रवाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.राजेश वसावे, डॉ.शरद काळे, वैद्यकिय अधिकारी डॉ.अविनाश मावची, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरीषचंद्र कोकणी उपस्थित होते.खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, असे शिबिर दरवर्षी घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र करुन सर्व आजारांचे निराकरण झाले पाहिजे. नवापूरसाठी रक्त साठवणुकीचे एकक मंजूर केले असून मंजूर असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या कामास चालना देण्यात येईल, असे सांगितले. डॉ.रघुनाथ भोये यांनी सिकलसेल आजार व मातृवंदन योजनेविषयी माहीती देऊन योग्य वयात विवाह करण्याविषयी मार्गदर्शन केले. काया कल्प योजनेअंतर्गत वैद्यकीय अधीक्षक व सर्व कर्मचा:यांनी रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी खूप परिश्रम घेतल्याने शासनाच्या आरोग्य सेवेतील महत्त्वाचा मानला जाणारा डॉ.आंनदीबाई जोशी पुरस्कार नवापूर उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. डॉ.राजेश वसावे यांनी सांगितले की, जिल्हाभरात प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दंत व सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सर्व प्रकारच्या आजारांविषयी मोफत उपचार रुग्णांना उपब्लध करुन देण्याचा प्रय} होत आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरीषचंद्र कोकणी यांनी कुपोषीत बालकांना प्रत्येक गावातील आशावर्कर यांना दत्तक दिल्याने कुपोषणाची समस्या दूर होण्यासाठी हातभार लागणार आहे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन समुपदेशक कैलास माळी यांनी तर आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश मावची यांनी मानले. शिबिरासाठी डॉ.युवराज पराडके, डॉ.मनिषा वळवी, डॉ.किर्तीलता वसावे, डॉ.प्रमोद कटारीया, डॉ.अमोल वळवी, डॉ.धिरेंद्र चव्हाण, डॉ.महेश मसराम, डॉ.प्रविण चौरे व सहकारी कर्मचा:यांनी परीश्रम घेतले.
नवापूर उपजिल्हा रुग्णालयात सर्वरोगनिदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:09 PM