जिल्ह्यात 51 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:38 AM2017-09-24T11:38:27+5:302017-09-24T11:38:27+5:30
सरपंचपदासाठी 231 इच्छुक : सोमवारपासून सुरू होणार अर्ज छाननी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी रात्री उशिरार्पयत अर्ज दाखल करण्याचे कामकाज सुरू होत़े यात 504 सदस्य आणि 185 प्रभागांसाठी 1 हजार 219 तर 51 लोकनियुक्त सरपंच पदासाठी 231 इच्छुकांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले आहेत़ यातही सात ग्रामपंचायती बिनविरोध ठरणार आह़े जागा तेवढेच अर्ज दाखल झाल्याने नवापूर तालुक्यात गंगापूर, वाटवी, पाडळदे ता़ शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील करणखेडा, सातुर्के, ओसर्ली आणि कानळदा या सात ग्रामपंचायती बिनविरोध ठरतील़
नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रनाळे, तलवाडे बुद्रुक, रजाळे, आसाणे, घोटाणे, अमळथे, ओसर्ली, सातुर्खे, तिसी, कानळदे, खैराळे, चौपाळे, कोठडे, धानोरा, करणखेडा, नवापूर तालुक्यातील शेही, भांगरपाडा, नानगीपाडा, अंठीपाडा, खडकी, व:हाडीपाडा, शेगवे, विसरवाडी, खेकडा, वाटवी, वावडी, गंगापूर, शहादा तालुक्यातील कळंबू, खैरवे, धांद्रे, पाडळदे ब्रुद्रुक, बहिरपूर, निंभोरा, बिलाडी त़ह़ अक्कलकुवा तालुक्यातील खापर, पोरांबी, डेब्रामाळ, कुकडीपादर, डनेल, मणिबेली, मोलगी, बिजरीगव्हाण, भगदरी, भाबलपूर, घंटाणी, विरपूर, सोरापाडा, अलीविहिर आणि अक्कलकुवा तर तळोदा तालुक्यात राजविहिर 51 ग्रामपंचायतींसाठी येत्या सात ऑक्टोबर मतदान होणार आह़े दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवारी त्या-त्या तालुका मुख्यालयांमध्ये करण्यात येणार आह़े येत्या 26 सप्टेंबर रोजी नामनिर्देशन माघारी घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर तात्काळ चिन्ह वाटप आणि प्रचाराला सुरूवात होणार आह़े
नंदुरबार तालुक्यातील धानोरा, रनाळे, शहादा तालुक्यात धांद्रे, नवापूर तालुक्यात विसरवाडी, खेकडा, वाटवी, शेही तर अक्कलकुवा तालुक्यात मोलगी, भगदरी, खापर आणि अक्कलकुवा ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरत आह़े़ शनिवारी या सर्व ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन दाखल करणारे उमेदवार व त्यांचे पॅनल प्रमुख यांच्यात बैठका सुरू होत्या़ सोमवारी छाननीनंत होणा:या माघारीसाठी कोणाची मनधरणी करावी, यासह विविध विषयांवर गांभिर्याने चर्चा केल्या गेल्याची माहिती आह़े शनिवारी सकाळपासून मोठय़ा गावांमध्ये वैयक्तिक भेटींवर भर देण्यात आल्याची माहिती आह़े