शहाद्यात 80 अतिक्रमण काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:09 PM2018-07-13T12:09:32+5:302018-07-13T12:09:39+5:30
नवीन भाजीमंडई : अनेकांनी स्वत:हून काढले; मोहिम सुरू ठेवणार
शहादा : शहरातील नवीन भाजीपाला मार्केटमध्ये व्यावसायिकांनी दुकानापुढे केलेले अतिक्रमण काढण्याची मोहीम पालिकेतर्फे गुरुवारी राबविण्यात आली. या मोहिमेत जेसीबीच्या सहाय्याने सुमारे 80 अतिक्रमण काढण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही मोहीम राबविताना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहादा पालिकेच्या नवीन भाजीपाला मार्केटमध्ये सुमारे 150 ते 200 गाळे आहेत. हे गाळे भाडेतत्वाने घेतलेल्या व्यावसायिकांना आपापल्या दुकानापुढे पाच ते सात फुटांर्पयत अतिक्रमण केले होते. त्यात काही व्यावसायिकांनी दुकानापुढे पत्र्याचे शेड तर काहींनी पाय:या बांधून दुकानातील साहित्य ठेवत होते. याठिकाणी काही जणांनी व्यावसायासाठी हातगाडय़ा लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. भाजीपाला घेण्यासाठी येणा:या महिला, युवती व नागरिकांना अतिक्रमण व हातगाडय़ांमुळे मार्केटमध्ये शिरणेही मुश्कील झाले होते. त्यातून दुकानदार व ग्राहकांमध्ये वादही निर्माण होत असत. त्यातच रस्त्याच्या कडेला हातगाडय़ा लावणारे व्यावसायिक तर स्वत:च्या मालकीची जागा असल्याची अविर्भावात वागत होते. भाजीपाला मार्केटमध्ये पावसाळ्यात दरुगधीचाही त्रास सहन करावा लागतो. याबाबत नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्याने गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ व पालिकेच्या अधिकारी कर्मचा:यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. त्यात दुकानापुढील पत्र्याचे शेड, पाय:या व अतिक्रमीत जागेवरील बांधकाम तोडण्यात आले. जेसीबी मशीन, दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले.
पोलीस बंदोबस्त
शहरातील नवीन भाजीपाला मार्केटमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. अतिक्रमण काढण्यासाठी व्यावसायिकांनीही मदत केली.
शहरातील इतर भागातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याचीही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.