शहादा - तालुक्यातील भादा शिवारात अवैध विदेशी मद्यासह 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आह़े राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे बुधवारी रात्री दहा वाजता ही कारवाई करण्यात आली़मिळालेल्या माहितीनुसार, भादा शिवारा अवैध विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती नंदुरबार येथील राज्य उत्पादक शुल्क विभागाला मिळाली़ कारवाईमध्ये मध्यप्रदेश निर्मित विदेशी मद्य 750 मि़ली़चे 120 बॉक्स व 180 मि़ली़चे 40 बॉक्स जप्त करण्यात आल़े या कारवाईत मुद्देमालासह आरोपी कैलास विजयसिंग पाडवी (रा़ भंवर ता़ तळोदा) याला ताब्यात घेण्यात आले आह़े आरोपीकडून पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आह़े वाहनासह 6 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागीय आयुक्त नाशिक प्रसाद सुव्रे व नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़ निरीक्षक अविनाश घरात, पी़एऩ गोंडा, दुय्यम निरीक्षक जी़जी़ अहिरराव, शैलेंद्र मराठे, जवान राजेंद्र पावरा, सुनील पवार, भूषण चौधरी, हंसराज चौधरी, वाहन चालक मानसिंग पाडवी आदींचा कार्यवाहीत समावेश होता़ गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी़जी़ अहिरराव यांच्याकडे सोपविण्यात आला आह़े
शहाद्यात विदेशी मद्यासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:08 PM