शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

लॉकडाऊनला शहादेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 12:24 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यातील अनेक भागात भागात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना संसर्गाला प्रतिबंध ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरासह तालुक्यातील अनेक भागात भागात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना संसर्गाला प्रतिबंध व्हावा यासाठी प्रशासनाने ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. रविवारी पहिल्या दिवशी शहरात नागरिकांची मोठी साथ मिळाली. संपूर्ण शहर बंद असल्याने मुख्य रस्त्यांवर व बाजारपेठेत शुकशुकाट आढळून आला. शहरात येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर पालिका प्रशासनातर्फे बॅरिकेटींग करण्यात आली असून विनाकारण फिरणाºया ३० मोटारसायकल चालकांवर पोलीस प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.३ जुलैला शहरातील आठ व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने ५ ते ८ जुलैपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकानासह सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. रविवारी पहिल्या दिवशी सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद होते. काही ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन करीत नागरिकांनी दुकाने सुरू ठेवली असता पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व कर्मचाऱ्यांनी दुकानदारांना त्वरित दुकान बंद करण्याच्या सूचना दिल्या. यापुढे शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, नगरपालिका चौक, गांधी पुतळा परिसर, जुना प्रकाशा रस्ता, मुख्य रस्ता व खेतिया रोड या भागात पालिका प्रशासनाने बॅरिकेटींग केले असून वाहतुकीला मनाई आदेश जाहीर केले आहेत. परिणामी या सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. शहरात विनाकारण फिरणाºया मोटारसायकलस्वारांवर पालिकेतर्फे मोटारसायकलच्या चाकातील हवा काढून कारवाई करण्यात आली.शहरासह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या व्हायरसने ग्रामीण भागाकडे आगेकूच केल्याचे स्पष्ट झाले आहे. याला बहुतांशी नागरिकच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उलंघन करीत नजिकच्या हॉटस्पॉट ठरलेल्या शहरात बिनदिक्कतपणे जाणारे नागरिक येताना दुर्दैवाने कोरोना विषाणू आणत आहेत. या नागरिकांच्या संपर्कातील कुटुंबीय व मित्र परिवारही त्यांच्या चुकीचे बळी ठरत असल्याचे वास्तव चित्र आहे.८ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊन कालावधीत वैद्यकीय सुविधा, मेडीकल स्टोअर्स, दूध विक्री, शासकीय कार्यालये व धान्य गोडाऊन वगळता सर्व प्रकारचे आस्थापना, दुकाने बंद करण्याबाबतचा आदेश जारी करण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन करणाºयांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी तथा इंन्सीडेंट कमांडर डॉ.चेतन गिरासे यांनी दिली आहे.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता. नागरिकांनी लॉकडाऊन दरम्यान शहरात गर्दी करू नये यासाठी विशेष खबरदारी पोलीस प्रशासनाने घेत विनाकारण मोटारसायकल घेऊन फिरणाºया ३० मोटारसायकल चालकांविरोधात पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आले आहे. शहरासह मलोणी व लोणखेडा या भागातही पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. तालुक्यातील दामळदा गावही तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे.आजमितीस तालुक्यात ३७ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून त्यातील १४ रूग्ण सुदैवाने उपचाराला साथ देत घरी परतले. तर शहरासह तोरखेडा, हिंगणी, लोणखेडा येथील प्रत्येकी एका बाधीत रूग्णांचे निधन झाले आहे. सध्या शहाद्यात १९, लोणखेडा येथे एक, हिंगणी येथे सहा तर तोरखेडा येथील सात अशा १९ रूग्णांपैकी १६ रुग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर दोन रूग्ण धुळे व एक रूग्ण नाशिकला उपचार घेत आहे. या १९ पैकी पाच रूग्ण वगळता उर्वरित १४ रूग्णांना उपरोक्त पाच रूग्णांकडून संसर्ग झाला आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टंन्सिंग व मास्कचे महत्व लक्षात येत आहे.