लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातून दोन लघूपटांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही लझुपटाद्वारे या महोत्सवात प्रथमच आदिवासी संस्कृतीची ओळख करुन देणाºया लघुपटाला स्थान मिळाले आहे.महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाणाºया पुण्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुण्यात होत आहे. भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुण्यामध्येच स्थित असल्यामुळे हा चित्रपट महोत्सव पुण्यामध्ये भरवणे सयुक्तिक ठरते. महाराष्ट्र शासनातर्फे पुणे चित्रपट महोत्सवामध्ये जागतिक तसेच मराठी चित्रपटांना अनेक पुरस्कार दिले जातात. यंदाच्या चित्रपट महोत्सवासाठी नंदुरबार येथील राहुल पवार दिग्दर्शित ‘भांगसर थाळ’ व ‘नंदीबैल’ हे दोन लघुपट (माहितीपट) २०२० च्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलच्या शर्यतीत सादर करण्यात आले आहे. आदिवासी समाजात थाळगीत (कथकरी - कथागीत) व नंदीबैल या लोककलांना अनन्यसाधारण महत्व आहे. यातून आदिवासी समाजाचे व्यवच्छेदक लक्षण असलेल्या ‘सामूहिकतेचे’ उत्स्फूर्तपणे आविष्कार पहावयास मिळतो. आदिवासींच्या या अस्पर्शित, अनोळख्या, आगळ्या-वेगळ्या अन् लोकगीत, लोकनृत्य व लोकसंगीतची उत्स्फूर्तपणे उधळण करणाºया लोकपरंपरांची संक्षिप्तपणे चलपट रुपात ओळख करून देण्यासाठी या लघुपटांची निर्मिती करण्यात आली आहे.मानवी जीवनात बरखत (संपन्नता) प्राप्त व्हावी ही डोंगरदेवास केलेली आळवणी व शाश्वत जीवनमूल्य प्रतिबिंबीत होत आहे. या लघुपटात सहभागी कलावंत व सहकाऱ्यांमध्ये नंदीबैलसाठी जागृती कला पथक, श्रीरामपूर, रुस्तम गायकवाड, दिनेश गायकवाड, राजेश गायकवाड रा.तलावपाडा, शुभम पवार, दीपक गावीत रा.वाघाळे ता.नंदुरबार यांचा समावेश आहे. तर थाळकरी कलाकारांमध्ये खंडू तुकाराम गावीत, विक्रम कोकणी, काशीराम कोकणी, भाईदास अहिरे, गायकवाड, डोंगरसिंग बागूल, वाडग्या गायकवाड, इंदरसिंग गांगुर्डे, गोकुळ गांगुर्डे, रामदास गायकवाड, चिनू चुळचंद चौरे, डोंगºया चिनू चौरे रा. सोनगीरपाडा ता.नंदुरबार यांचा समावेश आहे.मानवी जीवनात बरखत (संपन्नता) प्राप्त व्हावी ही डोंगरदेवास केलेली आळवणी व जीवनातील सत्य, मृत्यू, निसगार्चे श्रेष्ठत्व या सारख्या शाश्वत जीवनमूल्यांची अभिव्यक्ती यांचे प्रतिबिंब ‘नंदीबैल’ व ‘थाळगीत’ या लोककलांमधून दिसत आहे. आदिवासींच्या या अस्पर्शित, अनोळख्या, आगळ्या-वेगळ्या अन् लोकगीत, लोकनृत्य व लोकसंगीतची उत्स्फूर्तपणे उधळण करणाºया लोकपरंपरांची संक्षिप्तपणे चलपट रुपात ओळख करून देण्यासाठी या लघुपटांची निर्मिती राहुल पवार, गुरुनाथ बक्षी, सुलतान पवार यांच्या पथकामार्फत करण्यात आली आहे.नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास कोकणी या आदिवासी समाजातील युवकांमार्फत हे दोन्ही लघुपट सादर करण्यात येत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची ओळख जगाला होणार असल्याचे म्हटले जात आहे.