चार अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 11:53 AM2019-03-18T11:53:06+5:302019-03-18T11:53:27+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर आवश्यक तो पोलीस ...

Special facility at four susceptible polling booths | चार अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष सोय

चार अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष सोय

Next

नंदुरबार : जिल्ह्यातील चार मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात येणार असून चित्रिकरण देखील करण्यात येणार आहे.
गेल्या काही निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली असेल, मतदानात काही व्यत्यय आला असेल अशा ठिकाणच्या मतदान केंद्रांची नावे बाजूला काढून त्यातील पहिले पाच मतदान केंद्र संवेदनशील म्हणून ओळखले जातात.
लोकसभा निवडणुकीसाठी यंदा चार केंद्र हे अतिसंवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आलेली आहेत. त्यात नारायणपूर, ता.नंदुरबार, सुकवेल, बोडमाळ व धुळीपाडा, ता.नवापूर या मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.
या केंद्रांवर आधीपासूनच इमारतीचे, परिसराचे निरिक्षण करून परिसरातील उपद्रवी लोकांवर देखील कारवाई प्रस्तावीत करण्यात आलेली आहे.

Web Title: Special facility at four susceptible polling booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.