जिजामाता महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:44+5:302021-09-15T04:35:44+5:30
या कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते ...
या कार्यशाळेचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी दिलीप पाटील यांनी जिओ टॅगिंगचा शैक्षणिक क्षेत्रात कशा पद्धतीने वापर वाढत आहे. तसेच विविध प्रकारचे प्रकल्प राबवत असताना जिओ टॅगिंग किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते डॉ.सुमंत औताडे (सहायक प्राध्यापक स्वामी विवेकानंद नाईट कॉलेज, डोंबिवली) यांनी जिओ टॅगिंगचा वाढत असलेला वापर, वर्तमानकालीन वापर, जिओ टॅगिंगचा वापर विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन कार्यात कशा पद्धतीने करता येईल, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, व्यवसायिक, शेतकरी, शासनाचे विविध प्रकारचे प्रकल्प यामध्ये कशा पद्धतीने जिओ टॅगिंगचा वापर वाढत आहे याबाबत मार्गदर्शन केले. या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी १२४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रास्ताविक आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.एच.एम. पाटील यांनी केले. कार्यशाळेचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ.एस.व्ही. देवरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.विजय खंडारे यांनी केला. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.ए.बी. देशमुख यांनी तर आभार डॉ.आर.जी. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी ऑनलाइन उपस्थित होत्या.