टेंभा, देऊर व खैरवे-भडगाव येथील विजेच्या समस्येबाबत अभियंत्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:45+5:302021-09-14T04:35:45+5:30

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याचे दिवस असून थोडा जरी पाऊस झाला तरी फॉल्ट झाल्यानंतर दोन-दोन दिवस वीज बंद असते. ...

Statement to Engineers regarding power problem at Tembha, Deor and Khairve-Bhadgaon | टेंभा, देऊर व खैरवे-भडगाव येथील विजेच्या समस्येबाबत अभियंत्यांना निवेदन

टेंभा, देऊर व खैरवे-भडगाव येथील विजेच्या समस्येबाबत अभियंत्यांना निवेदन

Next

निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याचे दिवस असून थोडा जरी पाऊस झाला तरी फॉल्ट झाल्यानंतर दोन-दोन दिवस वीज बंद असते. कारण संबंधित लाईनमन दोंडाईचा येथे राहत असल्यामुळे कामात हलगर्जीपणा करतात व स्थानिक लोकप्रतिनिधींचा फोनही स्वीकारत नाहीत. यामुळे या गावातील लोकांना पाण्याची समस्या, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाची व वीज नसल्यामुळे उकाडा होतो. डास व मच्छरांपासून होणाऱ्या विविध साथीच्या आजारांना बळी पडत आहेत. अशा अनेकविध समस्यांपासून सुटका मिळावी म्हणून खैरवे-भडगावचे माजी सरपंच डॉ. उमेश पटेल, पोलीस पाटील धनराज पानपाटील, दिलीप गिरासे, देवेंद्र पानपाटील यांनी सारंगखेडा येथील वीज कंपनीचे अभियंता मन्सुरी यांना निवेदन देऊन वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी अभियंता मन्सुरी यांनी संबंधित लाईनमनला कडक सूचना देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Statement to Engineers regarding power problem at Tembha, Deor and Khairve-Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.