गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:35 AM2021-09-12T04:35:15+5:302021-09-12T04:35:15+5:30

रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी धडगाव : काही गाव-पाड्यांमधील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम ...

Sterilization campaign should be carried out in the village | गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी

गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी

Next

रोहयोची कामे सुरु करण्याची मागणी

धडगाव : काही गाव-पाड्यांमधील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे गावातील काही नागरिकांकडे कामच नसल्यामुळे त्यांना कुटुंबांचे पालनपोषण करताना अडचण येत आहे.

महागाई आर्थिक गणित कोलमडले

शहादा : कोरोना महामारीमुळे ग्रामीण व शहरी भागातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तेलाचे वाढते दर, कडधान्य, डाळीच्या दरातील वाढ, इंधन दरवाढ यामुळे दरमहा आर्थिक गणित जुळविणे अवघड होऊन बसले आहे.

साईडपट्ट्यांवर अतिक्रमण सुरूच

नंदुरबार : शहरातील बायपास लगतच्या साईडपट्ट्यांवर अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी रस्त्याच्या कडेला टपऱ्या उभ्या करून व्यवसाय सुरू केले असून, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Sterilization campaign should be carried out in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.