सत्तेच्या विकेंद्रीकरणासह स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करा : नंदुरबारात कै.बटेसिंह रघुवंशी पुतळा अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:19 PM2018-01-28T12:19:35+5:302018-01-28T12:19:40+5:30

Strengthening of local body institutions with decentralization of power: K.Batesingh Raghuvanshi statue unveiled at Nandurbar | सत्तेच्या विकेंद्रीकरणासह स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करा : नंदुरबारात कै.बटेसिंह रघुवंशी पुतळा अनावरण

सत्तेच्या विकेंद्रीकरणासह स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करा : नंदुरबारात कै.बटेसिंह रघुवंशी पुतळा अनावरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या सक्षम झाल्या पाहिजे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नंदुरबारात केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कै.बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पालिकेच्या जल-मल नि:सारण प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.
जीटीपी महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्तर प्रदेशचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार रजनी पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार सुरुपसिंग नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार सुधीर तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार डी.एस.अहिरे, आमदार सुनील गामित, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, धुळ्याचे शिवाजी दहिते, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, अॅड.पद्माकर वळवी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्याचे सत्ताकारण हे मुंबई अर्थात मंत्रालय केंद्रीत झाले आहे. तसे न होता गाव, शहरांचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधीक प्रबळ केले गेले पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिका, नगरपंचायतींना अधीक सक्षम केले पाहिजे. निर्णय घेण्याचे जादा अधिकार दिले गेले पाहिजे. कै.बटेसिंह रघुवंशी यांनी आजच्या 30 ते 40 वर्षापूर्वी या भागाचा विकास करण्यासाठी पद, सत्ता याची अपेक्षा केली नाही. आधी काम केले त्यानंतर त्या माध्यमातून पदे मिळविली. या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा प्रय} त्यांनी केला. आदिवासी दुर्गम व मागास परिसराचा विकास करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले होते असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 
न्या.दिलीप भोसले यांनी सांगितले, प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्याच्या प}ीच्या योगदानाप्रमाणेच आई-वडिलांचे संस्कार देखील महत्त्वाचे असतात. व्यक्तीच्या यशरूपी मंदीराचा पाया घडविण्याचे काम हे आई-वडिल करीत असतात तर कळस लावण्याचे काम हे प}ी करीत असते त्यामुळे दोन्हींचा वाटा हा मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. तीन प्रकारच्या व्यक्तींची व्याख्या करतांना त्यांनी तीन उदाहरणे दिली. पहिल्या प्रकारातील व्यक्ती ही खूप मोठी असते, परंतु ती इतरांना मोठी होऊ देत नाही. दुस:या प्रकारातील व्यक्ती स्वत: मोठी होते व आजूबाजूच्या लोकांनाही मोठी करते तर तिस:या प्रकारची व्यक्ती फक्त मोठी होते आणि स्वकेंद्रीत राहते. कै.बटेसिंह रघुवंशी हे स्वत: तर मोठे झालेच, परंतु आपल्या जवळच्या लोकांना देखील त्यांनी मोठे केले. आपण 35-40 वर्षापूर्वी पाहिलेले नंदुरबार व आजचे नंदुरबार यात मोठा फरक असल्याचे सांगितले. एक विकसीत शहर म्हणून नंदुरबार पुढे येत असल्याचे ते म्हणाले.
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाची अपेक्षा न बाळगता प्रत्येकाने काम केले पाहिजे.  आधी पद मग काम अशी धारणा आजच्या पिढीची आहे. पूर्वी काम करून पदासाठी जागा निर्माण केली जात होती आता सर्वच विरोधाभास आहे. कै.बटेसिंह रघुवंशी यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी चांगल्या व्यक्तींचा त्यांच्या विचारांचा आदर्श हा चिरकाल असतो. त्यामुळे सार्वजनिक जिवनात काम करतांना एक आदर्शवत काम केले तर ते पुढच्या अनेक पिढय़ांसाठी प्रेरणादायी असते. कै.बटेसिंह रघुवंशी यांनी पंचायत समिती सभापती पदापासून सार्वजनिक जिवनात कामाला सुरुवात केली आणि लोकनेत्यार्पयत त्यांनी आपला ठसा उमटविल्याचे ते म्हणाले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले, पूर्वी नंदुरबार हे ठिकाण प्रशासकीय अधिकारी, कर्मचा:यांसाठी पनिशमेंटचे ठिकाण होते. परंतु नंदुरबारचा झालेला विकास पहाता मागास हे विशेषण आता पुसले जात आहे. परिणामी अधिकारी येथे येण्यास स्वत:हून राजी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार रजनी पाटील यांनी देखील विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक अॅड.राजेंद्र रघुवंशी यांनी केले. आभार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा न्यायाधिश अभय वाघवसे, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, नवापूरच्या हेमलता पाटील, तळोद्याचे अजय परदेशी, संस्थेच्या अध्यक्षा विमलबाई पाटील, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, संस्थापक अध्यक्ष कै.जी.टी.पाटील यांच्या प}ी कमलबाई पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, दुपारी पालिकेच्या नळवा शिवारातील जल-मल नि:सारण केंद्राचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
 

Web Title: Strengthening of local body institutions with decentralization of power: K.Batesingh Raghuvanshi statue unveiled at Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.