पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:57 PM2019-08-03T12:57:45+5:302019-08-03T12:57:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबा दरम्यानच्या पुलांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांबरोबरच ...

Structural audit of the bridges is required | पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे

पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबा दरम्यानच्या पुलांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांबरोबरच पुलांची मोठी दुरवस्था झाल्याने  पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे झाले आहे.
ब:हाणपूर-अंकलेश्वर  राज्यमार्गावरील तळोदा ते नेत्रंगर्पयतचा रस्ता हा  शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात आला आहे. तळोदापासून नेत्रंगर्पयतच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या दृष्टीने कोणतेही ठोस काम या मार्गावर करण्यात आलेले नाही. तळोदा ते दरम्यान येणा:या पुलांची मोठी वाताहत झाली आहे. शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबार्पयत आठ ते दहा लहान-मोठे पूल येतात. पावसामुळे महामार्गावरील या पुलांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना व पादचा:यांना जीवघेणी कसरत करून या महामार्गावरून मार्गक्रमण करावे लागते.
राष्ट्रीय महामार्गावरील निंभोरा गावाजवळील श्रीकृष्ण खांडसरीजवळ असलेल्या गुजरात हद्दीतील पुलावर जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. पावसामुळे पुलावरील डांबर व खडी पूर्णपणे निखळली आहे.  डांबराखाली आच्छादन केलेल्या लोखंडी सळय़ा वर आल्या असून वाहनधारकांसाठी त्या अत्यंत जीवघेण्या ठरत आहेत. अशीच परिस्थिती अक्कलकुवा ते सोरापाडय़ाला जोडणा:या वरखेडी नदीवरील पुलाची आहे. दरवर्षी या पुलांवर मोठमोठे खड्डे पडतात. अल्पावधीतच या पुलावरील खडय़ांचे भगदाडमध्ये रूपांतर होते. या पुलांवर प्रचंड प्रमाणात वाहतूक असून दररोज हजारो जड-अवजड वाहने या पुलावरून मार्गक्रमण करतात. खड्डय़ांमधून मार्ग काढत वाहनधारक आपली वाहने कशीतरी पुढे नेतात. अशा दुचाकी चालकही खड्डे टाळत ट्रक-कंटेनरला मागे टाकत जीवघेण्या पद्धतीने पुढे निघतात. या खड्डय़ांमुळे वाहतूक मंदवते व अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यान वाहनांच्या मोठय़ा रांगा लागतात. त्यामुळे या पुलावर अपघाताची शक्यता निर्माण होते.
या दोन मुख्य पुलांसह राष्ट्रीय महामार्गावरील तळोदा ते सेलंबा दरम्यान कुकरमुंडा फाटय़ाजवळील पूल, अक्कलकुवा ते कुंभारखानफाटा दरम्यानचा पूल, खापर येथील देहली नदीवरील पूल आदी अनेक लहान-मोठय़ा नद्या व नाल्यांवरील पुलांची वाताहत झाली आहे. पुलांवर जीवघेणे खड्डे पडले असून संरक्षक कठडे, पिलर, जॉईंट यांचीही दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने मात्र राष्ट्रीय महामार्गावरील पुलांच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.  तळोदा ते सेलंबार्पयत रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाचा असून दिवसभरात हजारो वाहनांची या पुलांवरुन वर्दळ असते. त्यामुळे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील या दोन्ही महत्त्वाच्या पुलांवरील खड्डय़ांची चार महिन्यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसात या पुलांवर खड्डे पडल्यानेअत्यंत निकृष्ट दर्जाची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान वरखेडी नदीवरील पूल अत्यंत धोकेदायक बनला असून हा पूल कधीही कोसळेल अशी भीती वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागीलवर्षीही या पुलावर मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यानंतर या पुलावर पडलेले भगदाड व खड्डे प्रशासनाकडून बुजवण्यात आले. परंतु पहिल्याच पावसात या पुलाला पूर्वीप्रमाणे मोठे भगदाड व खड्डे पडलेले आहेत. प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी दोनदा खडी व मुरूम टाकण्यात आली. पुलावरील वाहतुकीमुळे पुलावर टाकण्यात आलेल्या मुरूम वखडीच्या ढिगा:यांमुळे  उंच-सखलपणा निर्माण झाला आहे. या उंच-सखलपणामुळे या पुलावर मार्गक्रमण करणारे ट्रक व कंटेनर त्याचप्रमाणे रिक्षा, चार चाकी वाहने उलटण्याची शक्यता असते. जीवघेणे खड्डे, खडी व मातीचे ढिगारे, उंचसखलपणा, जड-अवजड वाहनांची वर्दळ या परिस्थितीमुळे हा पूल कधी कोसळेल याचा काही नेम सांगता येत नाही. त्यामुळे या पुलावर प्रवास करताना वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात.
 

Web Title: Structural audit of the bridges is required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.