सीईटी पर्सेटाईलने विद्यार्थी व पालक संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:38 PM2019-06-08T12:38:35+5:302019-06-08T12:38:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीईटीच्या यंदाच्या पर्सेटाईल निकालामुळे पालक आणि विद्याथ्र्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोंधळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सीईटीच्या यंदाच्या पर्सेटाईल निकालामुळे पालक आणि विद्याथ्र्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गोंधळ दूर व्हावा अशी अपेक्षा पालकांमध्ये व्यक्त होत आहे. यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे विद्याथ्र्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता यामुळे निर्माण झाल्याने पालक चिंतेत आहेत.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटीचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. यंदा ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर करतांना तो प्रथमच पर्सेटाईल पद्धतीने जाहीर केला गेला. पर्सेटाईलचा हा प्रकार अनेक विद्याथ्र्याच्या आणि पालकांच्या आकलनाबाहेर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पालक आणि विद्यार्थी ठिकठिकाणी याबाबत विचारणा करीत असले तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकत नसल्याची स्थिती आहे.
सीईटीची पीक्षा यंदा ऑनलाईन झाली. पीसीएम ग्रृपची 4, 5, 6 मे रोजी झाली. दुस:या टप्प्यात पीसीएमबी ग्रृपचे पेपर झाले होते. नेहमीप्रमाणे या परीक्षेचा निकाल लागेल अशी अपेक्षा पालक व विद्याथ्र्याना होती. परंतु पर्सेटाईल काढून निकाल जाहीर झाला. यात देखील मोठय़ा प्रमाणावर तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप पालकांनी व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. निकालानुसार 88 गुण मिळविणा:या विद्याथ्र्याला 95 तर 124 च्या रँकमध्ये गुण मिळविणा:या विद्याथ्र्यालाही 95 पर्सेटाईल दाखविण्यात आले आहेत. यामुळे अनेक विद्याथ्र्याचे चांगल्या महाविद्यालयातील प्रवेशाचे स्वप्न अपुर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्सेटाईल काढण्याची पद्धत ही पुढील प्रमाणे असते. अ विद्याथ्र्याच्या मागे असलेले एकुण विद्यार्थी, भागिले परिक्षा देणारे एकुण विद्यार्थी गुणीले 100 या सूत्रानुसार पर्सेटाईल काढले गेले. यामुळे एखाद्या विद्याथ्र्याला चांगले गुण मिळून देखील त्याचे पर्सेटाईल कमी दिसून येत आहे.
निकालाची ही तांत्रिक त्रुटी दूर करून विद्यार्थी व पालकांची संभ्रमावस्था आणि अन्याय दूर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दुसरीकडे 7 तारखेपासूनच सीईटीअंतर्गत निकाल लागलेल्या विद्याथ्र्याना जिल्हानिहाय सेतू केंद्रातून प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा व संभ्रम दूर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.