लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार नगरपालिकेकडून यंदा डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुणीया आदींबाबत नगरपालिकेच्या कर्मचा:यांसोबतच विद्याथ्र्यामार्फतही नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार आह़े पुढील आठवडय़ापासून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आह़े या अभियानात शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयांतील विद्याथ्र्याना सहभागी करण्यात येणार आह़े सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुणगुनीया तसेच इतर संधीसाधून आजारांचा धोका निर्माण होत असतो़ नंदुरबारात अद्यापर्पयत डेंग्यूचे रुग्ण आढळले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेकडून या आधिच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े या दिवसांमध्ये डेंग्यू किंवा सदृश आजार आपले डोके वर काढत असतात़ त्यासाठी नगरपालिकेकडून अनेक वेळा आजूबाजूला स्वच्छता ठेवा, पाणी साचनार नाही यासाठी रिकामी भांडी पालथी करुन ठेवा आदींबाबत प्रबोधन करण्यात येत असत़े परंतु या मोहिमेला नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा:यांकडून सांगण्यात येत असत़े परंतु यंदा पालिकेकडून यावर नवीन प्रयोग म्हणून शहरातील शाळा, विद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्याथ्र्यामार्फत नंदुरबारकरांचे प्रबोधन करण्यात येणार आह़े यासाठी स्वता मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी पुढाकार घेतला आह़ेयाबाबत नगरपालिकेकडून संबंधित शाळा, महाविद्यालयातील व्यवस्थापनाशी बोलून विद्याथ्र्याना पालिकेच्या या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार आह़े विद्याथ्र्याकडून पथनाटय़, पोस्टर, तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांना डेंग्यू, मलेरियापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आह़े संबंधित विद्याथ्र्याकडून नगरपालिका हद्दीतील परिसरात जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आल़े यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचा:यांचे वेळावेळी विद्याथ्र्याना मार्गदर्शन उपलब्ध होणार आह़े डेंग्यू बाबत जिल्ह्याची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले आह़े अद्यापर्पयत डेंग्यू किंवा सदृश आजाराचा रुग्ण आढळला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़ भोये यांनी लोकमतशी बोलताना सांगितल़े त्यामुळे सध्या तरी डेंग्यूची चिता नसली तरी याबाबत आधिच काळजी घेतलेली बरी या उद्देशाने पालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आह़ेदरम्यान, पालिकेकडून सध्या शहरातील विविध ठिकाणी जंतू नाशक फवारणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी सांगितल़े तसेच शहरातील नागरिकांना रिकामी भांडी पालथी ठेवा, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा आदींबाबत सांगण्यात आले आह़े शहरातील बहुसंख्य भागात घराच्या छतावर नागरिकांनी निरुपयोगी भांडी आढळून आले आहेत़ पावसाच्या पाण्यामुळे यात डासअळ्या निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही़ यामुळे सर्वाधिक डेंग्यू, मलेरिया आदींचा प्रभाव वाढत असल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असत़े त्यामुळे नागरिकांनी पालिकेकडून देण्यात आलेल्या निर्देशाचे पालन करावे असेही सांगण्यात येत आह़े
‘डेंग्यू’बाबत आता विद्याथ्र्याचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 1:27 PM