प्रेमाचा असाही रंग प्राण्यांना मिळतोय मानवी ममतेचा संग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:51 AM2019-02-14T11:51:59+5:302019-02-14T11:52:05+5:30
भूषण रामराजे । नंदुरबार : परी, गड्डम, भूतू, चिंगी, मांगू, कानू, सोनू आणि आणखी इतर एकाच वेळी जमल्यास १५ ...
भूषण रामराजे ।
नंदुरबार : परी, गड्डम, भूतू, चिंगी, मांगू, कानू, सोनू आणि आणखी इतर एकाच वेळी जमल्यास १५ होतात़ दिवसभर येथेच खातात, झोपतात हे सर्व म्हणजे आमचं कुटूंबच आहे असं लक्ष्मीबाई हेमंत मरसाळे ह्या सांगत होत्या़ कोठेही बेवारस मांजर आढळलं की त्याला घरी घेऊन जात संगोपनाची जबाबदारी घेणाऱ्या लक्ष्मीबाई आणि त्यांचे पती हेमंत यांचे मांजरप्रेम संपूर्ण शहरात परिचित आहे़
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाची माहिती घेत भेट घेतली असता, मांजरींचं गोकूळच भासावं असं त्यांच्या घराचं वातावरण होतं़ घराच्या प्रत्येक कोपºयात एक मांजरीचा वावर, फ्रिज, कपाट, पलंग, सोफा अशा सर्वच ठिकाणी मरसाळे कुटूंबाच्या लळ्याने वास्तव्य करणाºया मनीमाऊ मुक्तपणे संचार करुन पहुडल्या होत्या़
गांधीनगर भागातील प्लॉट क्रमांक १५३ मध्ये राहणारे हेमंत मरसाळे हे जिल्हा परिषदेत नोकरीस आहेत तर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई ह्या गृहिणी आहेत़ साधारण १५ वर्षांपूर्वी लक्ष्मीबार्इंना घराजवळच्या नाल्यात मांजरीचं पिलू बेवारस अवस्थेत आढळून आलं होतं़ या पिलाला घरी आणून मरसाळे कुटूंबाने त्याला जीवदान दिलं़ त्यांच्यात निर्माण झालेल्या जिव्हाळ्याने आज मांजरींनी भरलेलं घर म्हणून मरसाळे कुटूंबांचा परिचय होतो आहे़ आजअखेरीस मरसाळे यांच्या चौकोनी कुटूंबासह १५ मांजरी त्यांच्या घरात राहतात़ प्रत्येकाची नावे ठरलेली आहे़ नुकतीच त्यांच्या भूतू या मांजरीने तीन पिलांना जन्म दिला आहे़ त्यामुळे ही संख्या आता १८ वर गेली आहे़ मांजर असलं म्हणून काय झालं तोही प्राणी आहे, असा विचार मनात धरुन हे अख्खं कुटूंब त्यांची सेवा करत आहे़
सायंकाळी प्रत्येक मांजराला मांसाहारी पदार्थ किंवा दूध देणे सक्तीचे आहे़ सोबत मांजरांसाठी लागणारे खाद्य आणि इतर पदार्थ देऊन त्यांचे संगोपन केले जाते़ यातही एखाद्या पिलाला आजारपण आल्यास लक्ष्मीबाई ह्या जातीनं लक्ष घालून त्याची सुश्रुषा करतात़ बºयाचवेळा पशुवैद्यकांना बोलावून उपचार केले जातात़ थंडीच्या दिवसात बाम लावण्याचेही काम लक्ष्मीबाई काळजीपूर्वक करतात़ सतत मागे फिरणाºया एवढ्या मांजरी पाहून अनेकांना भिती वाटत असल्याने त्यांना बोलावणेही टाळले जाते़ यातून वाईट वाटत असले तरी लहान-लहान मुलांना कोणी घरी एकटं सोडून जातं असा भावनात्मक प्रश्नही त्या उपस्थित करतात़