टँकर फसल्याने वाहतूक वळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:11 PM2019-08-13T12:11:28+5:302019-08-13T12:11:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील धुळे चौफुली ते भोणे फाटादरम्यान सुरु असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक भोणे फाटा मार्गाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील धुळे चौफुली ते भोणे फाटादरम्यान सुरु असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक भोणे फाटा मार्गाने वळवण्यात आली आह़े या मार्गावर सोमवारी सकाळी दूध वाहून नेणारा टँकर फसल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहतूक पुन्हा दुस:या मार्गाने वळवण्यात आली़
अव्वल गाझी दर्गा ते भोणे फाटा या दरम्यान खड्डेमय झालेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता़ यानुसार गेल्या महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली़ यामुळे वाहतूक भोणे फाटा येथून व्ही़जी़राजपूत पेट्रोलपंप मार्गाने वळवण्यात आली आह़े आधीच कच्च्या असलेल्या या रस्त्यावर सोमवारी सकाळीच मोठा टँकर फसला यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली़ पोलीस प्रशासनाने याठिकाणी तातडीने धाव घेत नव्याने तयार होणा:या क्राँक्रिटरस्त्याच्या बाजूने असलेल्या पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्यात आली आह़े वाहतूक शाखेकडून दोन्ही बाजूने 10 वाहने सोडण्याचे काम सुरु करण्यात आले आह़े
दरम्यान दुपारच्यावेळी फसलेल्या टँकरच्या डिङोल टाकीतून अज्ञातांनी चालकाला धमकावून डिङोल चोरुन नेल्याची माहिती समोर आली आह़े या प्रकारामुळे अवजड वाहनचालकामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने गुजरात राज्यात होणारी वाहतूक धुळ्याकडून नंदुरबारकडे वळली आह़े यामुळे मार्गावर वाहने वाढली आहेत़ यात टँकर फसल्याने वाहतूकीची मोठी कोंडी होत आह़े