शेळीपालन करणाऱ्या ठाकरे बंधूंचा गावात असाही उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:44 PM2020-04-26T13:44:50+5:302020-04-26T13:44:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या जांबाई या छोट्याशा गावातील शेळीपालन व्यवसाय करणारे सुरूपसिंग जामसिंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या जांबाई या छोट्याशा गावातील शेळीपालन व्यवसाय करणारे सुरूपसिंग जामसिंग ठाकरे व केसरसिंग जामसिंग ठाकरे या बांधवांनी आपल्या गावातील कुठल्याही ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ येऊ नये याची खबरदारी घेत गावातील ग्रामस्थांना साखर, चहा, तेलसह किराणा वस्तु तसेच भाजीपाला वाटप केले. या वेळी त्यांचे वडील जामसिंग ठाकरे, आई सुनकीबाई ठाकरे, मित्र देवीसिंग वळवी, सुरेश मोरे, उत्तम वळवी यांच्यासह वाटप करण्यात आले.
दरम्यान सुरूपसिंग ठाकरे व केसरसिंग ठाकरे यांच्याकडे २०० हून अधिक शेळींचे पालन करण्यात आले असून, हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असला तरी सर्वत्र लॉकडाऊनमुळे परिस्थिती लक्षात घेता आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेने या दोन्ही बांधवांनी आर्थिक जुळवाजुळव करून गावातील जवळपास १८० कुटुंबांना किराणा तसेच भाजीपाल्याचे वाटप केले.
या दोन्ही बांधवांसह त्यांचे वडील जामसिंग ठाकरे हे दरवर्षी सातपुडा पायथा परिसरात मोठ्या प्रमाणावर सिताफळ, महू, आंबे यासारखी वृक्ष लागवड करून संगोपन करीत असून, त्याचबरोबर परिसरातील ग्रामस्थांनाही वृक्ष लागवडीसह नेहमीच प्रवृत्त करीत असतात.