शहादा : महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पावसाळी दिवसांमध्ये पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आह़े सध्या घाटमाथ्यावर तुरळक स्वरुपाचा पाऊस व ढगाळ हवामान असल्याने येथील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना चांगलेच आकर्षित करीत आह़े राज्यातील विविध ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात़ विशेषत हिवाळा व पावसाळ्यात पर्यटक येण्याची संख्या ही अधिक असत़े आठवडय़ाच्या शेवटी म्हणजे विकेंडला पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसून येत़े शुक्रवारी या ठिकाणी मोठय़ा संख्येने पर्यटकांची रेलचेल दिसून आली़ जुलै ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस असल्याने येथील निसर्ग अधिक खुलून दिसत असतो़ येथील डोंगरद:यांनी जणू काही अंगावर हिरवा शालू परिधान केला असल्याची मनमोहक चित्र दिसत असत़े त्यामुळे केवळ खान्देशातीलच नव्हेत तर, राज्य व देशभरातूनही पर्यटक या ठिकाणी येत निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत असतात़ राहण्यासाठी व्यवस्था असल्याने पर्यटक आपल्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी मुक्काम ठोकत असतात़ तोरणमाळ येथील सात पायरी घाटापासूनच निसर्गाचे सुंदर असे दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत अअसत़े सिताखाई, सनसेट पॉईंट, खडकी पॉईंट, मच्छींद्रनाथ गुफा, यशवंत तलाव आदी ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असत़े सिताखाई पॉईंट वरील मनमोहक दृश्य व यशवंत तलावातील बोटींगमुळे बालकांसह जेष्ठ नागरिकही या ठिकाणी रमत असल्याचे दिसून येत़े दरम्यान, येथील गोरक्षनाथ मंदिरातसुध्दा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आह़े या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागत आहेत़ यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना मंदिराच्या आवारात नारळसह पुजासाहित्य विक्रीतून ब:यापैकी रोजगार उपलब्ध होत आह़े या शिवाय अनेक व्यावसायिकांकडून या ठिकाणी जेवन तसेच नाश्ताची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आह़े त्यामुळे यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आह़े उंचावरील भाग असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाणही सर्वाधिक असत़े सध्या ढगाळ हवामान तसेच तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो़ हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात पर्यटकांचा या ठिकाणी येण्याचा ओघ अधिक असतो़ त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही प्रशासनाला कार्यवाही करावी लागत असत़े नंदुरबारातील प्रमुख आकर्षण असल्याने आता देशी पर्यटकांसोबत विदेशी पर्यटकांचीही गर्दी याठिकाणी होऊ लागली आह़े
तोरणमाळ येथे पर्यटकांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:28 PM