ट्रॅप कॅमेरे लावूनही उपयोग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:35 AM2021-09-12T04:35:10+5:302021-09-12T04:35:10+5:30
तळोदा : तळोदा तालुक्यातील मोदलपाडा, तळोदा शिवारात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात सिंह किंवा बिबट्याही आढळून आला नसल्याची स्थिती ...
तळोदा : तळोदा तालुक्यातील मोदलपाडा, तळोदा शिवारात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात सिंह किंवा बिबट्याही आढळून आला नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे.
तळोदा शिवारात एका शेतात सिंह पाहिल्याचा दावा एका शेतकऱ्याने केला होता. शिवाय त्याच भागात बिबट्याची जोडीदेखील पाहिल्याचे त्यांनी सांगितले होते. शिवाय काही दिवसापासून या भागात बिबट्या दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब लक्षात घेता, वन विभागाने शुक्रवारी या भागात ट्रॅप कॅमेरे लावले. परंतु त्यात बिबट्या किंवा इतर कुठलाही हिंस्र पशू या ठिकाणी दिसून आला नाही. त्यामुळे वन विभाग आणखी काही दिवस ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवणार आहे. दरम्यान, या भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.