धमकी देत युवतीला पळवून नेले; तरूणीच्या फिर्यादीवरून युवकाविरुद्ध गुन्हा
By मनोज शेलार | Published: June 9, 2023 07:34 PM2023-06-09T19:34:37+5:302023-06-09T19:34:56+5:30
याबाबत मुलीने नवापूर पोलिसांत युवकाविरोधात फिर्याद दिली आहे.
नंदुरबार: माझ्याशी लग्न कर नाही तर जिवे ठार मारून टाकणार, समाजात बदनामी करणार, असे युवतीला धमकावीत एकाने बळजबरीने तिला मोटारसायकलवर बसवून पळवून नेल्याची घटना ५ जून रोजी डोकारे, ता. नवापूरनजीक घडली. याबाबत मुलीने नवापूर पोलिसांत युवकाविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नवापूर तालुक्यातील डोकारे येथील युवती नवागाव येथे शाळेत जात असताना ५ जूनला गावाबाहेर काही अंतरावर युवतीला गाठून गिरीष सुता वळवी (२३) याने लग्न कर नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, असे धमकावीत बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. नवापूरहून तो युवतीला नाशिक येथे घेऊन गेला. तेथून सुटका करीत युवतीने नवापूर पोलिसांत गिरीष वळवी याच्याविरोधात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक तेरसिंग वसावे करीत आहेत.