तीन पायांचे सरकार फार काळ धावणे शक्यच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:43 PM2020-01-04T12:43:43+5:302020-01-04T12:43:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव/बोरद : सातबारा कोरा करण्याच्या वल्गना करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे. अवकाळीग्रस्त शेतकºयांना कर्जमुक्तीपासून दूर ठेवण्याचे पाप हे सरकार करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी धडगाव व बोरद, ता. तळोदा येथील जाहीर प्रचार सभेत बोलतांना केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या धडगाव व बोरद, ता.तळोदा येथे सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, भाजप सरकारच्या काळात शेतकºयांना पारदर्शकपणे कर्जमाफी दिली होती. त्याचा लाभ शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर झाला. शेतकºयांना कर्जमुक्ती देवून सातबारा कोरा करणार, अशा खोट्या वल्गना केल्या. या उलट पुरवणी बजेटमध्ये एकही दमडीची तरतूद केली नाही. जिल्ह्यातील आदिवासी जनतेला सव्वा लाख घरे दिली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सडके बनविलीत, १८ हजार गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. नामांकीत शाळांमध्ये ५० हजार आदिवासी मुले चांगले शिक्षण घेत आहे. आदिवासी शेतकºयांना वनपट्टे देऊन सिंचन सुविधा दिली असल्याचे सांगून अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाची मुदत २०२० मध्ये संपत असतांना त्याआधीच त्यावर कायदा करून ते कायम केले. साहजिकच भाजपाचा या वाढता जनाधारामुळे विरोधक हतबल झाले. परिणामी भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तीन पक्षांची संधी साधू महाविकास आघाडी राज्यात सत्तारूढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन डॉ.शशिकांत वाणी यांनी केले.
माजी जिल्हा प्रमुख नागेश पाडवी, सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष शिवाजी पराडके, सुनील पाटील, राजेंद्रकुमार गावीत, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राजपूत, शेतकरी आघाडीचे प्रमुख प्रविणसिंग राजपूत उपस्थित होते.
जिल्ह्यातील नेते व आमदार फडणवीस यांच्यात जिल्ह्यातील गट व गणातील लढतींवर चर्चा होेऊन रणनिती आखली गेली. भाजपचीच सत्ता येईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी स्थानिक नेत्यांनी दिली. आमदार देवेंद्र फडणवीस यांनी देखील आवश्यक त्या सुचना यावेळी नेत्यांना दिल्या.