नंदुरबारच्या मंगळबाजारात तोबा गदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:09 PM2020-07-01T12:09:13+5:302020-07-01T12:09:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपाय योजना केल्या जात असताना मात्र, काही ...

Toba Gadi in Mangalbazar of Nandurbar | नंदुरबारच्या मंगळबाजारात तोबा गदी

नंदुरबारच्या मंगळबाजारात तोबा गदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपाय योजना केल्या जात असताना मात्र, काही नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना दिसून येत आहे. मंगळवारी खरेदी-विक्री करण्यासाठी तोबा गर्दी उसळली होती. अनेक बहाद्दरांनी नियम धाब्यावर बसवत कोरोनालाच आव्हान दिलेय. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या १०० च्या पार गेली आहे. सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासनातील अधिकारी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांमध्ये गुंतलेले आहेत तर दुसरीकडे काही नागरिक कोरोनालाच आव्हान देताना दिसून येत आहेत. अनेक वेळा अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आवाहन करून सुद्धा नागरिक कोरोना नियमावलीची पायमल्ली करीत आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही बेजबाबदार नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक नागरिकाने तोंडावर मास्क वापरले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकू नये. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजेत. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील मुख्याधिकाºयांना आदेश दिले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कामाच्या व सार्वजनिक ठिकाणी मास्क, अथवा रूमाल न वापल्यास, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास प्रथम आढळल्यास ५०० रूपये दंड, दुसºयांदा आढळल्यास दोन हजार रूपये दंड व तिसºयांदा आढळल्यास पाच हजार रूपये दंड आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पथक प्रमुख राजेश परदेशी, राजेंद्र पाखले, अनिल सोनार, राजेश श्रीमाळ व कल्याणसिंग ठाकूर, नसीम बानू पिंजारी, वंदना मराठे, राजाराम साबळे, मनीषा भापकर, अजित सोनवणे, नागुबाई नाईक, वसंत पेंढारकर, निखिल तांबोळी, गंगाबाई पराडके, अख्तरखान पठाण, उज्वला अहिरे, शशिकांत वाघ, बेबीबाई कडवे, सायली बाविस्कर, महेंद्र परदेशी यांनी शहरातील विविध भाग तसेच बाजारपेठांमध्ये जाऊन नियम डावलनाºयांना दंड केला.

नंदुरबार नगरपालिकेकडून कारवाई करण्यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. एका पथकामध्ये पाच कर्मचाºयांचा समावेश आहे. पाच कर्मचाºयांचे पथक शहरातील रेल्वे रूळाच्या दक्षिणेकडील भाग व रेल्वे रूळाच्या उत्तरेकडील भागांमध्ये कोरोना नियमावलीची अंमलबजावणी न करणाºयांवर दंडात्मक कारवाईसाठी नेमणूक केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कर्मचाºयांना जबाबदारी पूर्वक कामकाज पार पाडावे लागणार आहेत. कामकाजात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पथक प्रमुखांना देण्यात आले आहेत. कारवाईचा दैनंदिन अहवाल रोज नगरपालिकेच्या कार्यालयात सायंकाळी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टळावी यासाठी आठवडे बाजार रद्द करण्यात आले आहेत. तरीही नागरिकांची मंगळवारी गर्दी कायम होती. बाजारात येणारे काही नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. अनेक जण तोंडाला मास्क सुद्धा लावत नाहीत तर काही नागरिक खरेदीसाठी येताना दोन सीट, तीन सीट मोटरसायकलद्वारे थेट बाजारात येत असतात. अशांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी खाक्या दाखविला.

Web Title: Toba Gadi in Mangalbazar of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.