ई-मंडी अंतर्गत आडत्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:13 PM2017-08-18T12:13:27+5:302017-08-18T12:13:27+5:30
ऑनलाईन बाजार भाव : 30 बाजार समितींमध्ये नंदुरबारचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजार समितीमधील संगणकीय लिलाव व इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटय़ाद्वारे मोजमाप करण्याच्या नवीन पद्धतीचे व्यापारी, आडते व सर्व संबधित घटकांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. राज्यातील 30 बाजार समितींमध्ये ही पद्धत पहिल्या टप्प्यात लागू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कृषी बाजार या योजनेअंतर्गत बाजार समितीत आलेल्या शेतमालाचे संगणकीय लिलाव व इलेक्ट्रॉनिक्स काटय़ाद्वारे मोजमाप करण्याच्या पद्धतीची अंमलबजावणी येथील बाजार समितीत देखील करण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले. बाजार ई-नाम पोर्टलवर आतार्पयत 227 व्यापा:यांनी व 68 आडते यांनी नोंद केली आहे. या योजनेच्या उद्दीष्टानुसार राष्ट्रीय स्तरावर सामाईक बाजाराची स्थापना, विक्री व्यवहार पद्धतीत सुसूत्रता व समानता, पारदर्शक विक्री व्यवस्था, स्पर्धात्मक किंमत आणि तत्पर ऑनलाईन पेमेंट, शेतमालाचे ग्रेडींग त्यामुळे खरदेदीदारांना गुणवत्तेची माहिती होणे, स्थिर किंमतीमुळे ग्राहकांना वाजवी किंमतीत चांगल्या गुणवत्तेचा माल उपलब्ध होणार आहे. यामुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढल्यावर शेतमालाला चांगला भाव मिळणार असून त्याचा फायदा शेतक:यांना होणार आहे.
यावेळी जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय आहेर, जिल्हा पणन व्यवस्थापक सचिन पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, बाजार समितीचे सभापती भरतभाई पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
येत्या हंगामापासून ज्वारी, मका, बाजरी, गहू व दादर आदी शेतमालाचे लिलाव हे उभ्या वाहनात होऊन खरेदीदार यांचे बाजार समिती आवारातील प्लॉटवर मोजमाप करण्यात येईल. शेतमाल विक्रेत्यांच्या बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर नोंदणी करण्याकरीता शेतमाल विक्रीस आणतांना बँक पासबुकची ङोरॉक्स व आधार कार्ड ङोरॉक्स सोबत आणणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.