वीज कंपनीच्या कार्यालयांना निकड ईलेक्ट्रीकल ऑडिटची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 01:51 PM2021-01-27T13:51:23+5:302021-01-27T13:51:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहर व तालुक्यातील दीड लाख वीजग्राहकांची जबाबदारी सांभाळणा-या वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार शहरातील कार्यालयांनाच ...

Urgent electrical audit to power company offices | वीज कंपनीच्या कार्यालयांना निकड ईलेक्ट्रीकल ऑडिटची

वीज कंपनीच्या कार्यालयांना निकड ईलेक्ट्रीकल ऑडिटची

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहर व तालुक्यातील दीड लाख वीजग्राहकांची जबाबदारी सांभाळणा-या वीज वितरण कंपनीच्या नंदुरबार शहरातील कार्यालयांनाच इलेक्ट्रिकल ऑडिटची गरज आहे. जीर्ण आणि भाडोत्री इमारतींमध्ये सुरू असलेल्या कार्यालयांमध्ये वीजपुरवठा करणारी उपकरणे आणि साहित्य हे आउटडेटेड असून यातून अधिकारी व कर्मचारी यांचेही जीव धोक्यात आहेत.
शाॅर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे शाॅर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रकार राज्यातील विविध भागांत घडत आहेत. यात सर्वांना वीजपुरवठा देत उजेड देणा-या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्येच सुरक्षेबाबत अंधार असल्याचे चित्र दिसून आले आहे. शहरातील गिरीविहार, नेहरूनगर, बाजार समिती परिसरात या कार्यालयांमध्ये भेटी दिल्या असता, येथील दिवे, स्वीच हे गेल्या अनेक काळात बदलण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी वायरिंगही खराब झाल्याचे दिसून आले आहे. गिरीविहार येथील इंदिरासंकुलातील कार्यालय एका छोट्याशा जागेत सुरू आहे. यातून वीजकंपनीकडूनच कर्मचारी सुरक्षेबाबत उदासीन भूमिका असल्याचे दिसून आले. नंदुरबार जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे दोन विभाग आहेत. यात शहादा आणि नंदुरबार या दोन विभागांत स्वतंत्र कार्यालये आहेत. नंदुरबार शहरात बसस्थानक परिसरात वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. अत्यंत मोकळी अशी इमारत असतानाही अडगळीचे स्वरूप या जागेला प्राप्त झाले आहे. जागोजागी जुनाट वीजसाहित्य टाकले आहे.  इमारती ह्या जुनाट व जीर्ण असल्याने पावसाळ्यात कर्मचा-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात कार्यालये  ३०       

अधिकारी आणि कर्मचारी ५३३     

इंदिरा संकुल 
शहरातील इंदिरासंकुलात शहराच्या दुस-या बाजूचा कारभार सांभाळणारे वीज कंपनीचे कार्यालय आहे. अत्यंत अडगळीच्या या जागेत अधिका-यांना कधी-कधी बसण्यासही जागा नसल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने या कार्यालयात एकच लाइट लावून रात्री कामकाज केले जाऊ शकते. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी हीच स्थिती आहे. ऊन येवू नये म्हणून येथे अधिकारी हिरवे कापड लावून आतमध्ये बसतात.

बसस्थानक परिसर
नंदुरबार बसस्थानकासमोर कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय आहे. येथे अधिकारी व कर्मचारी यांची दालने आहेत. ही इमारत भाडेकरार पद्धतीने आहे. ही इमारत पत्र्याची शेड असून अधिकारी व कर्मचा-यांसाठी पीओपी तयार करण्यात आले असल्याचे दिसून आले. परंतू या पिओपीवर पावसाळ्यात पाणी पडून ते ही खराब झाल्याचे सांगण्यात आले. इमारतीच्या मागील बाजूसची भिंत पूर्णपणे जीर्ण आहे. 

 बाजार समिती परिसर 
कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय बाजार समिती परिसरात रस्त्याला लागून आहे. ही इमारतही जुनीच आहे. या इमारतीचेच ऑडिट होण्याची आवश्यकता आहे. आतील भागात काही चांगल्या सोयी असल्या, तरीही इलेक्ट्रिक ऑडिटबाबत मात्र उदासीनता आहे. रस्त्याला लागून असलेल्या इमारतीत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले आहे. कर्मचारी दिवसभर कसेतरी करुन कामकाज करतात. 

शहरातील तिघी कार्यालयांच्या इमारती ह्या भाड्याच्या आहेत. सेफ्टीच्या हिशोबाने योग्य त्या सुविधा करण्यात आल्या आहेत. ऑडिटची माहिती घेवून कारवाई करु. 
-एस.एम.पाटील,कार्यकारी अभियंता, 

Web Title: Urgent electrical audit to power company offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.