जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:29+5:302021-09-15T04:35:29+5:30
खांडबारा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्त हिंदी काव्य ...
खांडबारा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्त हिंदी काव्य व गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.एम. निकुंभ होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक व्ही.एस. वाघ, ए.एस. पाडवी तर प्रमुख वक्ते म्हणून आर.डी. सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदी शिक्षक ए.के. लोहार तर प्रास्ताविक पी.जी. देसले यांनी केले. आभार एस.एस. महाले यांनी मानले. या स्पर्धेमध्ये पाचवी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लक्ष्मी छगन गावीत, तनीषा रूपेश वळवी, रोशनी सुरेश नाईक, राजश्री राजू वसावे, रोशनी दीपक वसावे, राधिका विनेश वसावे, महेश जितेंद्र गावीत, ध्रुवी जगदीश कारले, स्नेहा आनंद वसावे, सोहम रमेश वसावे, कुसुम वसावे, पुनम पाडवी, अनामिका वळवी, नवनीत प्रमोद चिंचोले, किशोरी अशोक पाडवी यांनी काव्य व गीतगायन स्पर्धेत सहभाग घेतला. पी.जी देसले यांनी गीत सादर केले. पर्यवेक्षक विलास वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.एम. निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून देशात का बोलली जाते याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख वक्ता आर.डी. सोनवणे यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमासाठी पी.एम. चिंचोले यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.माध्यमिक विद्यालय, अंबाबारी
अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी येथील माध्यमिक विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.आर. बोरसे होते. या वेळी कथा-कथन, निबंध व सुंदर हस्ताक्षर, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. पाचवी ते सातवीचा लहान गट तर आठवी ते दहावीचा मोठा गट अशी दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. कथा-कथनात लहान गटात जसोदा सीताराम तडवी, नरपत दिलवरसिंग वसावे, कंकू सुभाष तडवी, वकृत्व स्पर्धेत प्रथम नरपत दिलवरसिंग वसावे, द्वितीय भावनी जयराम तडवी, तृतीय विशाल जयंतीलाल तडवी, चित्रकलेत छाया राजेश तडवी, जसोदा सीताराम तडवी, कंकू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांना हिंदी भाषा विषयी आर.एस. पाडवी, एस.व्ही.पाडवी, व्ही.जी. मगरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आर.एस. पाडवी, मगन तडवी, शिल्पा.पी. वळवी, ए.डी. टवाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदी विषय शिक्षक एस.व्ही. पाडवी यांनी केले. आभार आर.एस. सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.