Vidhan Sabha 2019 : शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चढला ज्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:01 PM2019-10-15T13:01:42+5:302019-10-15T13:01:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने प्रचाराला जोर चढला आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे कर्णकर्कश आवाजात प्रचाराच्या रिक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने प्रचाराला जोर चढला आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे कर्णकर्कश आवाजात प्रचाराच्या रिक्षा फिरू लागल्या आहेत. ठिकठिकाणी कोपरा सभा आणि कार्यकत्र्याची प्रचार फेरी काढली जात आहे. त्यामुळे आता ख:या अर्थाने निवडणुकीचा ज्वरू चढू लागल्याचे चित्र तयार होत आहे.
कुठलीही निवडणूक असली तर थेट अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात होत होते. मतदारांच्या भेटी किंवा ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणारा प्रचार नागरिकांना नकोसा होत असतो. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात तीन निवडणुका नागरिकांनी अनुभवल्या. त्यात नगरपालिका, लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर ती देखील अनुभवली गेली असती. याशिवाय गावोगावच्या ग्रामपंचायती निवडणुका देखील रंगल्या. या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार अखेर्पयत जनतेला नाकीनऊ आणणारा ठरला होता.
आता विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर देखील तोच अनुभव येईल की काय अशी शंका जनतेला असतांना यंदा मात्र, प्रचारात उशीराने रंग भरला गेल्याचे दिसून आले. आता प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. जागोजागी उमेदवारांचे होर्ड्ीग दिसू लागले आहेत.
काही ठिकाणी एलईडी स्क्रिन असलेली व त्यावर उमेदवार आणि प्रचाराचे वाहने देखील फिरू लागली आहेत. कर्णकर्कश आवाजातील ध्वनीक्षेपक लावलेल्या रिक्षा देखील फिरू लागल्या आहेत. विद्याथ्र्याच्या सहामाही परीक्षा सुरू असतांनाच आता प्रचाराला जोर आल्याने विद्याथ्र्याच्या अभ्यासावर देखील परिणाम दिसून येऊ लागला आहे. शनिवार सायंकाळर्पयत सार्वजनिक प्रचार करण्याची मुदत असल्याने जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहचण्यासाठी प्रत्येक उमेदवार आता आटापीटा करू लागला आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांनी पदाधिकारी आणि घरातील व्यक्तींना विविध भाग वाटून दिले आहेत. जास्तीत जास्त गावांमध्ये आणि मतदारांर्पयत पोहचण्याचा त्यामागे उद्देश आहे.