गाव ‘नदीकाठी’ तरीही वणवण ‘पाण्यासाठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:25 PM2018-12-17T12:25:53+5:302018-12-17T12:25:59+5:30
शहादा : सातपुडय़ातून वळणे घेत शहादा तालुक्यात अवतरणा:या गोमाई नदी काठावरील दामळदे गावाची पाण्याअभावी दैना होत आह़े नदीकाठी गाव ...
शहादा : सातपुडय़ातून वळणे घेत शहादा तालुक्यात अवतरणा:या गोमाई नदी काठावरील दामळदे गावाची पाण्याअभावी दैना होत आह़े नदीकाठी गाव असूनही ग्रामस्थ शेजारच्या गावशिवारातून पाणी आणून तहान भागवत आहेत़ गेल्या 10 वर्षापासून मिनीबॅरेज होणार या अपेक्षेने डोकं थंड ठेवणा:या गावाने आता पाण्यासाठी लढा उभारण्याची हाकाटी दिली असून पाण्यासाठी ग्रामस्थ मोर्चा घेऊन प्रशासनाच्या दारी जाणार आहेत़
शहादा तालुक्यातील मध्यप्रदेश सिमेपासून काही अंतरावर गोमाई नदी काठावर 1 हजार 600 लोकसंख्या असलेले दामळदे गाव आह़े साधारण 400 घरांची वस्ती असलेल्या या गावात 2006 पूर्वी पाण्याची टंचाई नावालाही नव्हती़ गावाने नदीपात्रात केलेल्या विहिरीतून बारमाही पाणीसाठा उपलब्ध होत असल्याने गावात ‘जलसुबत्ता’ होती़ गोमाई नदी येथे साधारण 8 महिने प्रवाहित राहत असल्याने शेतीला पाणी मिळत होत़े शासनाने तत्कालीन धुळे जिल्ह्यात असताना पाटबंधारे विभागाने गावापासून काही अंतरावर केटी वेअर बंधारे उभारल्याने त्यात पाणी राहून गावाची भूजल पातळी समतोल होती़ परंतू 2006 नंतर या स्थितीत आमुलाग्र बदल होण्यास सुरुवात झाली़ पजर्न्यमान कमी झाल्याने पावसाळ्यात पूराचे लोंढे पाहणा:या ग्रामस्थांनी सप्टेंबर महिन्यात नदी आटताना पाहिली़ यात बंधारे नादुरुस्त होऊन दरवाजे तुटून पडल़े लोकवर्गणी करुन ग्रामस्थांनी दरवाजे उभे केल्यावर नदीला म्हणावा तसा पूर आला नाही़ कालांतराने हे दरवाजे गंजून खराब झाल़े तूर्तास सर्व बंधारे पूर्णपणे उध्वस्त झाल़े एकीकडे ही समस्या असताना दुसरीकडे नदीपात्रातील विहिरही कोरडी झाली़ याऐवजी मग मंदाणा गावापासून काहीअंतरावर दुसरी विहिर खोदून पाणी पुरवठा सुरु झाला़ परंतू गेल्या तीन वर्षात पाऊसच नसल्याने ही विहिर यंदापासून पूर्णपणे कोरडी झाली आह़े यावर मात करण्यासाठी केलेल्या कूपनलिकेतून गावातील चार पैकी एका वार्डात आठ दिवसातून एकदाच पाणी देणे शक्य आह़े यामुळे गावातील प्रत्येक घरासमोरील नळाला महिन्यातून एकदाच काही मिनीटांसाठी पाणी येत़े या स्थितीवर मात करण्यासाठी सरपंच हरेदास कृष्णा मालचे आणि उपसरंपच डॉ़ विजय चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत नदीच्या दुस:या बाजूला असलेल्या कुरंगी येथून पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती़ परंतू या मागणीवर अद्याप कारवाई झालेली नाही़
जमिनीत पाणी नसल्याने शेतक:यांचा रब्बी हंगाम पूर्णपणे थांबला असून मजूर रोजगाराविना घरीच बसून आहेत़ गावात पाण्याची टंचाई दूर व्हावी यासाठी प्रशासनाकडून गेल्या 10 वर्षापासून सव्रेक्षण करुन लालफितीत गुंडाळल्या गेलेल्या मिनी बॅरेज प्रकल्पाची निर्मिती करण्याची मागणी आह़े यासाठी दामळदे गावापासून काही अंतरावर नदीपात्रात खोलीकरण करुन बांधकाम होणार असल्याची माहिती आह़े ही जागा केवळ दामळदेच नव्हे तर शहादा तालुक्यातील गोगापूर सह उत्तरेकडील सर्व गावांसाठी लाभदायक ठरणार आह़े या मिनी बॅरेजची निर्मिती झाल्यास किमान 700 हेक्टर जमिन ओलीताखाली येऊन पुन्हा जुने दिवस परत येतील अशी अपेक्षा ग्रामस्थांची आह़े यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आले आह़े