रुग्ण वाढल्याने ग्रामस्थ धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:28 PM2020-07-06T12:28:59+5:302020-07-06T12:29:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा गावातील ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या रुग्णाच्या अतिसंपर्कातील १३ जणांना शहादा येथेल विलागीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. पैकी ७८ वर्षीय पुरुषाचे उपचार सुरू असताना निधन झाले. या महिला रुग्णाच्या संपर्कातील मयत पुरुषासह सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.
तोरखेडा गावातील महिला रुग्णाला कोरोनाची लक्षणे जाणवल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात खबरदारीच्या उपाययोजनांसह गाव कटेनमेंट झोन क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
तोरखेडा गावाच्या सीमा व गावात येणारे रस्ते बॅरिकेट लावून बंद करण्यात आल्या आहेत. जवळील हिंगणी, दोंदवाडे, फेस ही गावे बफर झोनमध्ये आहेत. बफर झोनमधील हिंगणी गावातही ४९ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तेथील १३ लोकांना विलगीकक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालांपैकी तोरखेडा येथील महिला रुग्णाच्या संपर्कातील सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात नंदुरबार येथे उपचार सुरू असताना १ जुलै रोजी मृत्यू झालेल्या वृद्धाचाही समावेश आहे.
तोरखेडा गावात ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण करण्यात आले असून लॉकडाऊचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.