मांजरे शिवारात हिंस्त्र प्राण्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:15 PM2018-12-10T13:15:16+5:302018-12-10T13:15:35+5:30

नंदुरबार : तालुक्यातील मांजरे येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गायीचे वासरु ठार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती़ हल्ला करणारा ...

Violence against animals in Manjre Shivar | मांजरे शिवारात हिंस्त्र प्राण्याचा संचार

मांजरे शिवारात हिंस्त्र प्राण्याचा संचार

Next

नंदुरबार : तालुक्यातील मांजरे येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गायीचे वासरु ठार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती़ हल्ला करणारा हिंस्त्र प्राणी हा बिबटय़ाच असल्याचे सांगण्यात आले असून यामुळे परिसरात चिंता व्यक्त करण्यात येत आह़े हल्ला करणारा बिबटय़ा हा शहादा तालुक्यात मांजरे शिवारात आल्याची माहिती वनविभागाने दिली आह़े
मांजरे शिवारातील गाय  ठार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह पथकाने याठिकाणी भेट देत पाहणी केली होती़ या पाहणीत शेतशिवारात हिंस्त्र प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होत़े या ठश्यांचे परीक्षण केल्यावर ते बिबटय़ाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ यानंतर केलेल्या तपासणीत बिबटय़ाने हल्ल केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आह़े 
या पाश्र्वभूमीवर वनविभागाकडून मांजरे, आराळे, निंभेल, कं्रढे यासह विविध गावांमध्ये वनपाल आणि वनरक्षक यांच्या गस्ती पथक सुरु करण्यात आली आहेत़ या पथकांकडून रात्री उशिरार्पयत ही गस्त सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े  
अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबटय़ाने या भागात धाव घेतल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आला आह़े वनक्षेत्रातून या भागात आलेल्या बिबटय़ाच्या दहशतीमुळे शेतीकामांवर ब:याच अंशी परिणाम झाल्याचे सांगण्यात आले आह़े दुष्काळी भाग असल्याने याठिकाणी बिबटय़ाला जादा दिवस अन्न व पाणी न मिळाल्यास पाळीव गुरांवर हल्ले होण्याची शक्यता असल्याने वनविभागाकडून बिबटय़ाला हुसकावून लावण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत़ सातपुडय़ातील वनक्षेत्रात पाणवठे आणि अन्नाची कमतरता असल्याने हिंस्त्र प्राणी बाहेर पडल्याचे वनविभागाचे म्हणणे आह़े नंदुरबार तालुक्यातील काही भागात तरसांचा कळप फिरत असल्याची माहिती आह़े 
 तळोदा आणि शहादा तालुक्यात आजघडीस चारपेक्षा अधिक बिबट असल्याची माहिती देण्यात आली आह़े तसेच धडगाव तालुक्यात चार बिबटे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आह़ेमांजरे शिवारातील लखेसिंग गणपत राऊळ यांच्या शेतातील गायीचा बळी जाण्याच्या 15 दिवसांपूर्वी हिंस्त्र प्राण्याने शेळीला ठार केल्याचे सांगण्यात आले आह़े ही शेळी तरसाने ठार केली असावी असा अंदाज होता़ परंतू गायीवर हल्ला झाल्यानंतर बिबटय़ाचा संचार असल्याचे सांगितले जात आह़े 
वनविभागाकडून या भागात शेतशिवारात थांबलेले ठेलारी कुटूंबिय आणि आदिवासी बांधव यांच्या भेटी घेत त्यांना सूचना केल्या आहेत़ ठेलारींकडे असलेल्या मेंढय़ांवर हल्ला होण्याचा दाट संभव असल्याने त्यांना हिंस्त्र प्राण्यापासून पाळी जनावरांची सुरक्षा कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले आह़े यातील काही जण पूर्वीपासून प्रशिक्षित असले तरी त्यांच्या कुटूंबातील इतरांना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आह़े  
नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातही वनविभागाने गस्त सुरु केली असून बिबटय़ाचा माग काढण्याचा प्रयत्न होत आह़े बिबटय़ाला या भागात स्थिरावू न देण्याचा प्रयत्न वनविभागाचा आह़े कोपर्ली ते मांजरे तसेच विविध भागातील पाणथळ जागा आणि दाट झाडीसह निजर्न टेकडय़ांमध्ये बिबटय़ा लपण्याची शक्यता असल्याने उपाययोजनांना वेग दिला जात आह़े 

Web Title: Violence against animals in Manjre Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.