‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार्थीना बक्षिसाच्या रकमेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:03 PM2018-12-29T13:03:54+5:302018-12-29T13:03:58+5:30

ग्रामविकास अडखळला : सहा गावे 10 लाखापासून वंचित

Waiting for prize money for 'Smart Village' prize | ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार्थीना बक्षिसाच्या रकमेची प्रतिक्षा

‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार्थीना बक्षिसाच्या रकमेची प्रतिक्षा

Next

नंदुरबार : ग्रामविकास विभागाकडून स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुका आणि जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना सहा महिने उलटूनही बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही़ तालुकास्तरावर प्रथम ग्रामपंचायतीला 10 तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावणा:या ग्रामपंचायतीला 40 लाख रुपये देण्याची तरतूद आह़े 
ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावरुन स्मार्ट ग्राम योजना सुरु करण्यात आली आह़े यांतर्गत 5 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या, शहरालगत, पुरस्कारप्राप्त आणि पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींचे गुणांकन करुन पुरस्कार देण्याची पद्धत अंगीकारण्यात आली आह़े यासाठी स्थानिक स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व कृषी विभागाचे विस्तार अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता, सहायक लेखाधिकारी आणि पंचायत समिती तालुकाविस्तार अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आह़े या समितीकडू दरवर्षी त्या-त्या गावांचे मूल्यांकन करुन गावांची निवड करण्यात येत आह़े यानुसार नंदुरबार जिल्ह्यात 15 ऑगस्टपूर्वी तालुकानिहाय सहा गावे आणि जिल्हास्तरावर एका गावाची निवड करण्यात आली होती़ या गावांना 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आल़े यावेळी या ग्रामपंचायतींना रक्कम देण्याचे सांगण्यात आले होत़े परंतू सहा महिने उलटूनही या ग्रामपंचायतींच्या खाती पुरस्काराची रक्कम जमा करण्यात आलेली नाही़ 
पुरस्काराची रक्कम रक्कम मिळेल यासाठी पदाधिकारी जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत़ यात त्यांना सव्वा लाख रुपये देण्यात आल्याचे सांगण्यात येत़े परंतू खात्यावर ‘सव्वा रुपया’ही  आलेला नसल्याचे संबधित पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याकडून सांगण्यात येत आह़े ही रक्कम देण्याची कारवाई ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ स्तरावरुन होत असल्याचे सांगून जिल्हा परिषद अंग काढून घेत आह़े परंतू शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार पुरस्कार घोषित झाल्यानंतर पुरस्कार वितरणाच्या दिवशीच ‘रोख’ स्वरुपात ही रक्कम संबधितांना देण्याचे म्हटले आह़े यातही सहा महिन्यांचा कालावधी जाऊनही ग्रामपंचायती या रकमेपासून वंचित आहेत़ विशेष म्हणजे या रकमांमधून ग्रामपंचायतींना शुद्ध पेयजल प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि खत निर्मिती, सौर पथदिवे, बायोमास आदी कामे करायची होती़ परंतू निधीच नसल्याने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची निर्मिती संबधित ग्रामपंचायतींसाठी ‘स्वपA’च ठरत असल्याचे बोलले जात आह़े 2017-18 या वर्षात गुणांकनाच्या आधारावर नंदुरबार तालुक्यातील शिरवाडे, नवापूर तालुक्यात बोकळझर, मोहिदा ता़ तळोदा, पुरुषोत्तमनगर ता़ शहाद, खापर ता़ अक्कलकुवा आणि राजबर्डी ता़ धडगाव या गावांना स्मार्ट ग्राम पुरस्कार तालुकास्तरावर घोषित करण्यात आले होत़े या गावांना पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्ट रोजी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले होत़े ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लाख रुपये ‘रोख’ देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होत़े परंतू अद्याप त्यांना रक्कम मिळालेली नाही़ पहिल्या टप्प्यात 1 लाख 24 हजार रुपये देण्याचे ग्रामविकास विभागाने सूचित केले होत़े परंतू ही रक्कमही त्यांच्या खात्यांवर आलेली नाही़ 
या सहा गावांमधून बोकळझर ता़ नवापूर या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरावर प्रथम म्हणून निवड झाली होती़ पर्यायाने त्यांना तालुक्याचे 10 आणि जिल्हास्तरावरुन 40 असे 50 लाख मिळणे अपेक्षित होत़े परंतू संबधित ग्रामपंचायतीलाही अद्याप रक्कम मिळालेली नाही़ विशेष म्हणजे त्यांना जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्काराचे प्रमाणपत्र येत्या 26 जानेवारी रोजी देण्यात येणार आह़े 
 

Web Title: Waiting for prize money for 'Smart Village' prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.