सर्वाधिक मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:51 PM2019-10-23T12:51:09+5:302019-10-23T12:51:16+5:30

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य आणि देशपातळीवर दखलपात्र असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक आणि ...

Who will get the most votes on the path! | सर्वाधिक मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार !

सर्वाधिक मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार !

Next

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य आणि देशपातळीवर दखलपात्र असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक आणि माणिकराव गावीत यांचे प्रभावी अस्तित्त्व असलेल्या नवापुर मतदारसंघात सोमवारी तब्बल 75़37 टक्के मतदान झाल़े काँग्रेस, भाजप आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत रंगलेल्या या मतदारसंघात विक्रमी मतदानाचा हक्कदार कोण, याकडे आता लक्ष लागले आह़े   
काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून आजवर परिचित असलेला नवापूर विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांच्या नावाऩे 2009 च्या निवडणूकीचा अपवाद वगळला तरी 1972 पासून आमदार सुरुपसिंग नाईक यांचे नवापुर मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राहिले आह़े 2014 च्या सार्वत्रिक निवडणूकीतही आमदार नाईक यांच्या रुपाने काँग्रेसचा नंदुरबार जिल्ह्यातील ‘एक्स फॅॅक्टर’ नवापुर मतदारसंघातील विजयाने शाबूत राहिला होता़ वाढत्या वयोमानानुसार त्यांनी सत्तासूत्रे आपले पुत्र तथा आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक यांना देत राजकीय कारकिर्दीचा समारोप केला आह़े या समारोपाला काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक यांच्या विजयाची झळाळी लाभावी यासाठीच त्यांचा प्रयत्न असल्याचे कालपरवार्पयत दिसून येत होत़े येत्या 24 तारखेला त्यांच्या या प्रयत्नांना आलेले यश दिसूनच येणार आह़े  
याच मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा ज्यांच्या रुपाने नंदुरबार जिल्हा ओळखला जातो असे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांनी निवडणूकीतील प्रचारातून राजकीय प्रगल्भतेची छाप सोडली आह़े  गेल्या सहा महिन्यातील नाटय़मय घडामोडीतून  भरत गावीतांनी निवडणूकीत पूर्ण जोर लावल्याने त्यांच्या आशा पल्लवित आहेत़ राज्यस्तरावरील राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ धडक्यात व्हावा म्हणून त्यांनी गेल्या महिनाभरातील ‘इलेक्शन मॅनेजमेंट’ कमालीचे वेगवान ठेवत स्वत:च्या नावाची हवा खेळती ठेवली होती़
मतदारसंघातील तिसरे उमेदवार म्हणून माजी आमदार शरद गावीत यांचाही दावा आह़े मतदारसंघातील मतदारांना केंद्रार्पयत पोहोचवून मतदान वाढवण्यात त्यांचा व त्यांच्या कार्यकत्र्याचा मोठा हातभार आह़े प्रचारात स्थानिक मुद्दय़ांवर भर देणा:या शरद गावीतांना युवकांची खासकरुन साथ लाभल्याने निकालात त्यांचा वरचष्मा राहतो किंवा कसे, याकडेही लक्ष लागून राहणार आह़े या तिघांसोबतच भारतीय ट्रायबल पार्टीचे डॉ. उल्हास वसावे यांनीही प्रचारात लक्ष घेतल्याने त्यांना मिळणा:या मतांबाबत उत्सुकता लागून आह़े 


नवापूर मतदारसंघात एकुण दोन लाख 87 हजार 922 मतदार आहेत. त्यात 1,40,5722 पुरुष तर 1,47,349 महिला मतदार होते. त्यापैकी 1,08,422 पुरुष तर 1,08,596 महिला मतदार असे एकुण दोन लाख 17 हजार 018 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी अर्थातच 75.37 इतकी राहीली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 72 टक्के मतदान झाले होते.

मतदारसंघात नेहमीच रेकॉर्डब्रेक मतदान होत आले आहे. सरासरी 68 ते 76 टक्के मतदान झाल्याचा आतार्पयतचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा देखील तब्बल 75 टक्के मतदान झाले. त्याचा परिणाम कसा आणि काय होतो याकडे लक्ष लागून आहे. 

भरत गावीत -
जमेची बाजू - माजी खासदार माणिकराव गावीत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय दोन्ही पती-प}ी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे संपर्क, कार्यकर्ते जोडण्याची हातोटी यामुळे मतदार पाठीशी राहिले.  
उणिवा - एवढी वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्याने आणि आतार्पयतच्या सर्वच निवडणुकीत काँग्रेससाठी मतदान मागितले. आता काँग्रेसविरोधात राहून भाजपसाठी मतदान मागितले गेले. 

शिरिष नाईक - 
जमेची बाजू -  आमदार सुरुपसिंग नाईक यांचा जनसंपर्क, आतार्पयत केलेली कामे याचा फायदा. स्वत: साखर कारखान्याचे चेअरमन आणि पाच वर्षापासून मतदारसंघाची सांभाळलेली कमांड यामुळे त्याचा लाभ होण्याची शक्यता.  
उणिवा - बालेकिल्ल्यात खिंडार पडल्याने आणि काही कार्यकर्ते दुरावल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता.एकाही मोठय़ा नेत्याची सभा न झाल्याने फटका

शरद गावीत - 
जमेची बाजू - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ पिंजून काढल्याने त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीतील प्रचारात झाला. शिवाय यापूर्वी आमदार असतांना जोडलेले कार्यकर्ते आता कामाला आले.
उणिवा- अपक्ष आणि निवडणूक चिन्ह बदलामुळे मोठा फटका. सर्वच भागात पोहचण्यात आलेली अडचण.
 

Web Title: Who will get the most votes on the path!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.